• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘जिल्हा परिषद शाळा टिकल्या तरच गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचेल’ – निवृत्ती इंदुरीकर महाराज

शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीवर प्रभावी मार्गदर्शन

admin by admin
June 3, 2026
in महाराष्ट्र, रायगड
0
‘जिल्हा परिषद शाळा टिकल्या तरच गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचेल’ – निवृत्ती इंदुरीकर महाराज
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : सामान्य कुटुंबांतील मुलांचा आणि त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थितीचा विचार करता शासनाच्या जिल्हा परिषद शाळा टिकून राहणे अत्यंत आवश्यक आहे. या शाळांमुळेच तळागाळातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्ती इंदुरिकर महाराज यांनी केले. मावळा प्रतिष्ठान आणि संस्थापक अध्यक्ष मंगेश दळवी यांच्या वतीने आयोजित ‘गजर कीर्तनाचा… सोहळा आनंदाचा’ या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांतर्गत पेण पूर्व विभागातील वाकरूळ येथील वाकेश्वर मंदिर परिसरात त्यांचे भव्य जाहीर कीर्तन पार पडले. मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी आपल्या खास शैलीतून समाजप्रबोधनाचा संदेश दिला. त्यांनी अध्यात्म, संस्कार, व्यसनमुक्ती, सामाजिक जबाबदारी आणि कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व यांसारख्या विविध विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या विनोदी, ओघवत्या आणि प्रबोधनात्मक शैलीला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

कार्यक्रमाला माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, विविध प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना इंदुरीकर महाराजांनी मुलांना केवळ पैसा कमावण्यासाठी नव्हे, तर चांगले संस्कार मिळावेत यासाठी शिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले. जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे संस्कार असून समाजात सुसंस्कारित पिढी घडविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पेण आणि रायगड परिसरातील मोठा समाज वारकरी संप्रदायाशी जोडलेला असून या भागातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दिंड्या निघतात. त्यामुळे अध्यात्म आणि सामाजिक मूल्ये जपण्याची परंपरा अधिक बळकट करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

Previous Post

मासेमारी बंदी काळात ड्रोनची करडी नजर; नियमभंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार

Next Post

आमिर खान पुन्हा चढणार बोहल्यावर? गौरीसोबत लग्नाच्या चर्चांना उधाण

admin

admin

Next Post
आमिर खान पुन्हा चढणार बोहल्यावर? गौरीसोबत लग्नाच्या चर्चांना उधाण

आमिर खान पुन्हा चढणार बोहल्यावर? गौरीसोबत लग्नाच्या चर्चांना उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला

“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला

July 18, 2026
झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप

झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप

July 18, 2026
भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर देवस्थान सज्ज; विठ्ठल भक्तांसाठी ११ लाख बुंदी लाडूंचा महाप्रसाद!

भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर देवस्थान सज्ज; विठ्ठल भक्तांसाठी ११ लाख बुंदी लाडूंचा महाप्रसाद!

July 18, 2026
बारामतीची श्रावणी कुडाळेची देशभरात चमक! नीटमध्ये राष्ट्रीय पातळीवर पाचवा, मुलींमध्ये प्रथम क्रमांक

बारामतीची श्रावणी कुडाळेची देशभरात चमक! नीटमध्ये राष्ट्रीय पातळीवर पाचवा, मुलींमध्ये प्रथम क्रमांक

July 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,090)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (472)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,010)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,682)
  • मुंबई (3,274)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (467)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला

“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला

July 18, 2026
झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप

झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप

July 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला

“१००% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा १६८ रुपये लीटर!”; E20ला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला

July 18, 2026
झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप

झोपडपट्टीधारकांच्या स्वप्नांना सलमान खानचा हातभार; एसआरए कार्यालयात जाऊन केले घरांच्या चाव्यांचे वाटप

July 18, 2026
भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर देवस्थान सज्ज; विठ्ठल भक्तांसाठी ११ लाख बुंदी लाडूंचा महाप्रसाद!

भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर देवस्थान सज्ज; विठ्ठल भक्तांसाठी ११ लाख बुंदी लाडूंचा महाप्रसाद!

July 18, 2026
बारामतीची श्रावणी कुडाळेची देशभरात चमक! नीटमध्ये राष्ट्रीय पातळीवर पाचवा, मुलींमध्ये प्रथम क्रमांक

बारामतीची श्रावणी कुडाळेची देशभरात चमक! नीटमध्ये राष्ट्रीय पातळीवर पाचवा, मुलींमध्ये प्रथम क्रमांक

July 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION