पोलीस दलात नोकरी करताना संस्कार,वडीलधाऱ्या नागरिकांचा आदर ही रक्तात असल्याने ती सामाजिक बांधिलकी समजून प्रत्येक नागरिक त्यामध्ये लहान मुले व जेष्ठ यांचा आदर राहील याची काळजी घायची सवय जडून गेली होती आणि त्यामुळे पोलिसांबद्दल आदर व सहानुभूती देखील निर्माण होत असे, जेष्ठ नागरिक तसे शिस्तबद्द असतात परंतु त्यामुळे घरातील मंडळी त्याच्याकडे दुर्लक्ष्य करतात मग ते एकटे पडतात मग त्याचे मन मोकळे करण्यासाठी ते पोलीस ठाणे घाटतात असे बरेच अनुभव असल्याने त्याचे ऐकून व समजून घेण्याची सवय नव्हे मला तर ते आवडीचं वाटायचं. मी २०१७ मध्ये गोरेगाव पोलीस ठाणेत पोलीस ठाणे प्रमुख म्हणून कार्यरत होतो पोलीस ठाणेत बऱ्या पैकी सुधारणा करून अधिकारी व कर्मचारी यांचे बसण्याची व्यवस्था CCTV असल्याने मी नेहमीप्रमाणे सकाळी पोलीस ठाण्यात ९.३० ला पोहचलो साधारण एप्रिल महिना असल्यानं बऱ्यापैकी ऊन आणि उष्णता होती ,रोजचे रुटिंग कामकाज सुरू झाले, मी माझे कॅबिन मध्ये बसून पोलीस ठाण्याचे कामकाजावर लक्ष देत होतो साधारण दुपारचे १२ वाजले असावेत, एक ७०/७५ वयाची वयस्क महिला पोलीस ठाण्यात आली. ठाणे अंमलदार (तक्रार नोंद कक्ष्यात) त्यांच्याशी काहीतरी चर्चा केली आणि परत थोडे बाहेर जाऊन उभी राहिली पुन्हा १० मिनिटांनी आली परत काही तरी बोलली आणि परत बाहेर जाऊन उभी राहिली असे चार वेळा झाले तसे तक्रार नोंद कक्षात इतर तक्रारदार देखील नव्हते त्या आजीची चुळबूळ मी कॅमेऱ्यात पाहत होतो शेवटी मला राहवलं नाही आणि मला वाटले ठाणे अंमलदार त्या आजीचे काही ऐकत नाही म्हणून मी उठून बाहेर आलो त्यावेळी ती आजी तात्काळ माझे जवळ आली आणि तिच्या हाताच्या मुठीत काही तरी आवळून धरले होते ती मूठ उघडली आणि ती मला मुठीत धरलेली चुरगळलेली २० रुपयांची नोट देऊ लागली मला काही प्रकार समजेना मी आजीस म्हणले कश्यासाठी पैसे देताय ती म्हणाली मला सांगितले की सायबाला भेटायला पैसे द्यावे लागतात मला तर धक्काच बसला मी म्हणालो कोणी सांगितलं त्यावर ती म्हणाली आमचे आजूबाजूचे लोक बोलतात म्हणून मी पैसे आणलं आहेत माझे घरी तसे कोणीच नाही मी एकटीच राहते शेजारी मला त्रास देतात मी निःशब्द झालो मी माझे हवालदार यांना विचारले की या आजीची तक्रार का घेतली नाही त्यावेळी त्यांनी सांगितले की आजीने सांगितले की मला फक्त साहेबांना च भेटायचे मग आजीस विचारले हवालदार यांना तक्रार का सांगितली नाही त्या वेळी आजी म्हणाली माझेकडे फक्त २० रुपयेच आहेत मग साहेबास काय देऊ तक्रार किरकोळ होती पण पोलिसांबद्दल आजीच्या मनात वाईट गृह केला होता, आजीस विचारले तुम्ही आल्या कश्या त्यांनी सांगितले चालत आणि जाणार देखील चालत आजीचे गाव तसे पोलीस ठाण्यापासून ४ किलोमीटर होते एव्हढया उन्हात जाणार याचे वाईट वाटले म्हणून आजीला म्हणलं चला आजी तुमचे घरी कोण त्रास देतोय ते पाहू कारण ती बिचारी उन्हात चालत जाणार होती, आजीस घेऊन आमचे गाडीत गेलो शेजारी बोलावले आता पोलिसांचा साहेबच आजी बरोबर आला मग काय सर्वांना बोलवून कायदेशीर आणि काही पोलीस भाषेत समजावून सांगितले,आजीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता आजीस सांगितले या पुढे काही अडचण असल्यास पैसे न घेऊन येता भेटायचे आजी सारखे हात जोडू लागली तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता,आम्ही पुन्हा पुढच्या कामास निघालो.