पुणे : विमानतळ पोलीसांना ससून हॉस्पिटलकडून माहिती मिळाली कि, दि.२७ ऑक्टो.२०२२ रोजी पाहाटे चेतन मिसाळ याने आपली पत्नी संजना हि बेशुद्ध पडल्यामुळे उपचारासाठी ससून हॉस्पिटल मध्ये दाखल केली. डॉक्टरांनी तिला तपासणीपूर्वी मृत झाल्याचे सांगितले. त्यावेळी चेतन मिसळ याच्याकडे डॉक्टरांनी चौकशी केली असता त्याने पत्नी संजना हिने गळफास घेतल्याचे सांगून तो हॉस्पिटल मधून निघून गेला. सदर घटनेचा तपास करण्याकरिता गेले असता व.पो.नी.श्री.विलास सोंडे यांना मृत महिलेच्या गळ्याभोवती व्रण दिसल्याने त्यांना हि आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय वाढल्यामुळे त्यांनी अधिक चौकशी केली असता, मृत महिला संजना हि १३ वर्षांची असताना चेतन उर्फ आकाश मिसाळ याने तिला लग्नाचे आमिष दाखवून फूस लाऊन पळवून नेली होती. त्याबाबत त्याच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी संजनाहिला आई-वडिलांकडे राहायचे नसल्याने न्यायालयाच्या आदेशाने एस.ओ.एस. बालग्राम येरवडा, पुणे यथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला शिक्षणासाठी नेताजी विद्यालय येरवडा, पुणे येथे पाठविण्यात येत असताना तिला पुन्हा कोणीतरी पळवून नेल्याची सदर संस्थेच्या तक्रारी वरून येरवडा पो.ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर दरम्यानच्या काळात चेतन उर्फ आकाशने संजना सोबत शाररीक संबंध ठेवल्याने संजना हिने एका मुलास जन्म दिला. १ वर्षाच्या मुलासोबत चेतन उर्फ आकाश व संजना हे कोणालाही न सांगता नर्मदा कॉम्पलेक्स, लोहगाव, पुणे यथे भाड्याने राहत होते. काही दिवसांपूर्वी संजना हिने तिच्या आईला भेटून चेतन उर्फ आकाश हा तिला दारू पिऊन तिच्याशी सतत भांडण करत मारहाण करीत असल्याचे सांगितले होते. सदर घडला प्रकार मृत संजांनाच्या आईला समजतात तात्काळ चेतन उर्फ आकाश यानेच संजनाचा गळा दाबून खून केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. लगेच चेतन उर्फ आकाश याच्यावर विमानतळ पो.ठा.गु.र.नं.४०७/२०२२ भा.द.वी.क्र.३०२,३२३,३५३,३६६(अ) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ५(जे)(२),५(एल),६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी आरोपी चेतन उर्फ आकाश याला निंबाळकर नगर लोहगाव पुणे येथून अटक केली असता सुरुवातीला आरोपी हा पोलिसांच्या चौकशीला सहकार्य देत तो कसा निर्दोष असल्याचे दाखले देत होता मात्र ठाण्याचे व.पो.नी.श्री.विलास सोंडे यांनी आपल्या खासशैलीत तपास सुरु केल्यावर त्यानेच आपली पत्नी संजना हिला तिला सतत माहेरी जायचे असल्याच्या कारणावरून त्यांच्यात वारंवार भांडण होत असल्यामुळेच त्याने राहत्याघरी दि.२६/१०/२०२२ रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. आरोपी-चेतन उर्फ आकाश सोमनाथ मिसाळ याचे विरुद्ध सहकार नगर, विश्रांतवाडी व येरवडा पोलीस ठाणे येथे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळून आली आहे.
सदरची कारवाई श्री.नामदेव चव्हाण, अप्पर पो.आयुक्त(पूर्व प्रादेशिक विभाग), श्री.रोहिदास पवार, पो.उपायुक्त(परी-४), श्रीमती आरती बनसोडे, सहा.पो.आयुक्त(खडकी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पो.स्टे.चे व.पो.नी.श्री. विलास सोंडे, श्री.मंगेश जगताप,पो.नी.(गुन्हे), श्री.एस.एन.लहाणे(स.पो.नी.), श्रीमती रत्ना सपकाळे, महिला स.पो.नी. व आदी स्टाफने केली आहे. पुढील अधिक तपास श्रीमती रत्ना सपकाळे, महिला स.पो.नी. विमानतळ पोलीस ठाणे करीत आहेत.