• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

आरोग्य सेवेत कट प्रॅक्टिस व निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

admin by admin
July 3, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
आरोग्य सेवेत कट प्रॅक्टिस व निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तत्पर शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे सर्वोच्च उद्दिष्ट असून, या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, कट प्रथा किंवा रुग्णांना जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयांकडे वळविण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला. मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत त्यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेशी संबंधित समन्वयकांना स्पष्ट निर्देश दिले. या बैठकीला आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार महेंद्रशेठ दळवी, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक राजेंद्र भालेराव यांच्यासह विविध स्तरांवरील अधिकारी उपस्थित होते. मंत्री आबिटकर म्हणाले की, राज्यातील १०८ आणि १०२ रुग्णवाहिका सेवांचा उद्देश गरजू रुग्णांना तातडीने शासकीय रुग्णालयात किंवा महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी पोहोचविणे हा आहे. मात्र काही ठिकाणी रुग्णांना जाणीवपूर्वक विशिष्ट खासगी रुग्णालयांकडे पाठविल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळे मागील सहा महिन्यांतील रुग्ण पाठविण्याच्या सर्व नोंदींची सखोल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, समन्वयक आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात संस्थात्मक प्रसूतींचे प्रमाण वाढविण्यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. रुग्णांना विनाकारण खासगी रुग्णालयांकडे पाठविण्यात येत असल्याचे आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित केली जाईल. यासाठी प्रत्येक जिल्ह्याने सविस्तर सर्वेक्षण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

राज्यातील प्रत्येक शासकीय आरोग्य संस्थेत दर्जेदार औषधांचा पुरेसा साठा, स्वच्छता, आवश्यक मनुष्यबळ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा कायम उपलब्ध राहावी, यासाठी नियमित व प्रभावी देखरेख ठेवण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. शासनाने आवश्यक निधी व सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही कामात दिरंगाई किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ‘आरोग्य संवाद यात्रा’च्या माध्यमातून राज्यभर उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच गावपातळीवरील आरोग्य समित्यांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी सुरू असून, या पाहणीदरम्यान आढळणाऱ्या त्रुटींसाठी संबंधित यंत्रणेलाच उत्तरदायी धरले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्व जिल्ह्यांनी योजनेच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. गाव, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावरील सर्व आरोग्य समित्या अद्ययावत ठेवणे आवश्यक असून, कालबाह्य समित्या कायम ठेवण्याचा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही. विद्यमान सरपंच आणि सदस्यांचा समित्यांमध्ये समावेश करून त्यांचे नियमित कामकाज सुरू ठेवणे ही संबंधित जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच दर तीन महिन्यांनी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणाऱ्या जिल्हास्तरीय आरोग्य आढावा बैठकींना जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बैठकीत लोकप्रतिनिधींकडून मांडण्यात येणाऱ्या स्थानिक आरोग्यविषयक समस्या, गरजा आणि अपेक्षा थेट प्रशासनापर्यंत पोहोचतील. या बैठकींचे इतिवृत्त शासनाकडे सादर करण्यात येणार असून त्याआधारे पुढील कार्यवाही केली जाईल. आरोग्य सेवेमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्यातील प्रत्येक नागरिकाला सक्षम, विश्वासार्ह आणि परिणामकारक शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणेने संवेदनशीलतेने, प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने कार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

Previous Post

माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती; अण्णा हजारेंच्या आंदोलनाला यश!

Next Post

बीकेसी मेट्रो स्थानकातून जुलै महिन्यात प्रत्येक शुक्रवारी मोफत फीडर बससेवा!

admin

admin

Next Post
बीकेसी मेट्रो स्थानकातून जुलै महिन्यात प्रत्येक शुक्रवारी मोफत फीडर बससेवा!

बीकेसी मेट्रो स्थानकातून जुलै महिन्यात प्रत्येक शुक्रवारी मोफत फीडर बससेवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (17)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (484)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (106)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,033)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,883)
  • मुंबई (3,396)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (59)
  • राष्ट्रीय (513)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

वर्षभर १२ तास मोफत वीज; ५८ हजार कोटींची थकीत वीजबिले होणार माफ! – राहाता येथील सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे बळीराजाला आश्वासन

August 25, 2026
पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

पोलिसांची नोटीस येऊनही रविकांत तुपकर मुंबईत आंदोलनावर ठाम; शेतकरी कर्जमाफीसाठी २७ ऑगस्टला मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा!

August 25, 2026
आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

आता घराजवळच्या औषध दुकानातून मिळणार घरपोच औषधे!

August 25, 2026
ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

ताजे दाखवण्यासाठी बोंबीलांना चक्क गुलाबी रंग?

August 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION