मुंबई : मुंबई विमानतळावरून सोने तस्करी करणाऱ्यांवर महसूल गुप्तचर संचलनालयाने मोठी कारवाई केली आहे. महसूल गुप्तचर संचलनालयाने १ कोटींहून अधिक किंमतीची सोने तस्करी रोखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर पॅनकेक पावडरमधून सोन्याची तस्करी करणाऱ्यांच्या कस्टम विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. कस्टम विभागाच्या पथकाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १.३७ कोटी रुपयांची सोने जप्त केले आहे.
तस्करांकडून पॅनकेक पावडरमधून सोन्याची पूड मिश्रित करून तस्करी सुरू होती. चेक-इन बॅगेचे पाईप तसेच कपड्यातूनही सोन्याची तस्करी सुरू होती. पाच विविध प्रकरणांमध्ये एकूण २.४८ किलो सोने जप्त कारवाई केली आहे.