पुणे : गेल्या काही दिवसांपासून इराण अमेरिका-इस्रायल यांच्यात जे युद्ध सुरू झालंय, त्याचा फटका सर्वत्र बसत असून, इराणने हार्मुस सामुद्रधुनी बंद केल्याने गॅसचा तुटवडा जास्त होत आहे. भारतात व्यावसायिक गॅस बंद केल्यास घरगुती गॅसला मोठा संघर्ष करावा लागू शकतो. अशातच सर्वत्र पवित्र रमजान महिना सुरू असून, येत्या दोन दिवसांनी रमजान ईद साजरी होणार आहे. अमेरिका इस्राईल यांच्याकडून इराणचे सर्वोच्च नेते रहेबर सय्यद अली खामेनाई यांना हुतात्मा केल्याने जगभरात मुस्लिम समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली होती आणि आता रमजान ईददेखील साध्या पद्धतीने साजरी करण्याचं निर्णय घेतलाय.
सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून, दोन दिवसांनी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात सर्वत्र रमजान ईदच्या दिवशी ईदची नमाज, नवीन कपडे, शिरखुर्मा तसेच गोड पदार्थ बनविले जातात, मात्र जे युद्ध सुरू आहे, त्या युद्धात इराणचे सर्वोच्च नेता रहेबर सय्यद अली खामेनाई हुतात्मा झाल्याने जगभरात शिया मुस्लिम समाजाच्या वतीने यंदा रमजान ईद साध्या पद्धतीने साजरा केली जाणार असल्याचं निर्णय घेण्यात आलं आहे. याबाबत शिया मुस्लिम धर्म गुरू मौलाना शबिह एहसन काझमी म्हणाले की, सध्या जे युद्ध सुरू आहे ते इराणवर थोपवण्यात आलं असून, इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडून हे आतंकवाद आहे. या इस्राईल आणि अमेरिकेकडून युद्धाच्या सुरुवातीलाच १६० ते १७० लहान मुलांच्या मृत्यूने केली आणि यानंतर शिया मुस्लिम समाजाचे प्रमुख रहेबर सय्यद अली खामेनाई यांना हुतात्मा करण्यात आलंय. सर्वत्र त्यांच्या या हुतात्म्यानंतर निदर्शने करण्यात आली असून, सर्वत्र दुःखाचं वातावरण आहे. आज जगभरात इस्राईल आणि अमेरिकेचा जो खरा चेहरा आहे तो समोर आलाय. आम्ही सर्व समाजाच्या वतीने निर्णय घेतला आहे की, आम्ही ही ईद साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. कोणीही नवीन कपडे तसेच गोड पदार्थ बनवणार नसून फक्त ईदची नमाज अदा केली जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय.







