पुणे : रामबाग कॉलनी परिसरातील बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. घरमालक परदेशात गेल्यानंतर हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे रामबाग कॉलनी परिसरातील सोसायटीत राहण्यास आहेत. त्यांचे मुले परदेशात आहेत. त्यामुळे ते परदेशात गेले होते. २१ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत ते परदेशात होते. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घरातून ३ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तक्रारदार परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले.







