• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

कल्याण–मुरबाड मार्गावर दहा नव्या एसटी बस दाखल; आता दर १५ मिनिटांनी मिळणार सेवा!

admin by admin
June 30, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
कल्याण–मुरबाड मार्गावर दहा नव्या एसटी बस दाखल; आता दर १५ मिनिटांनी मिळणार सेवा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : कल्याण–मुरबाड मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या मार्गावर दहा नव्या बसगाड्या सुरू करण्यात आल्यामुळे आता प्रवाशांना नियमित आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावर बसफेऱ्यांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांना खासगी जीप, सहा आसनी रिक्षा आणि इतर प्रवासी वाहनांमधून अत्यंत दाटीवाटीने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही वारंवार ऐरणीवर येत होता. आता नव्याने उपलब्ध झालेल्या दहा बसगाड्यांमुळे कल्याण आणि मुरबाडदरम्यान पहाटे साडेपाचपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सरासरी दर पंधरा मिनिटांनी बससेवा उपलब्ध राहणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या निर्णयामुळे दररोज शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि अन्य कारणांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेवर होणार आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी होणारी प्रचंड गर्दी कमी होण्यासही या बससेवेची मदत होणार आहे. या मार्गावर वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत बसफेऱ्या अपुऱ्या असल्याची तक्रार प्रवासी संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यानंतर अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत होती.

या मागणीला अधिक बळ १३ एप्रिल रोजी घडलेल्या भीषण अपघातानंतर मिळाले. कल्याण–मुरबाड मार्गावरील रायते पुलाजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास इको टॅक्सी आणि सिमेंट मिक्सर यांच्यात भीषण धडक झाली होती. या दुर्घटनेत इको वाहनात दाटीवाटीने प्रवास करणाऱ्या ११ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा मुद्दा गंभीरपणे पुढे आला. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करून या मार्गावर अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांनंतर राजमाता जिजाऊ शटल योजनेअंतर्गत दहा नव्या बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. रविवारी आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत या नव्या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. या दहा बसपैकी पाच बस कल्याण ते मुरबाड आणि पाच बस मुरबाड ते कल्याण या मार्गावर धावणार आहेत. दोन्ही स्थानकांवरून पहिली बस सकाळी सव्वापाच ते साडेपाचच्या दरम्यान सुटेल, तर शेवटची बस रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवाशांच्या सेवेत असेल. या बसफेऱ्यांमुळे प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्वही कमी होईल. तसेच रिक्षा आणि जीपमधील धोकादायक प्रवासालाही मोठ्या प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुरबाड आगारप्रमुख योगेश मुसळे यांनी सांगितले की, नव्या बसगाड्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांना नियमित, सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल. भविष्यात प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार आणखी बसफेऱ्या वाढविण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.

Previous Post

खासगी क्लास आणि पूर्व प्राथमिक शाळांसाठी नवा कायदा येणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत मोठी घोषणा!

Next Post

तुकाराम मुंढे यांची मुंबईतील हॉटेलांवर धडक कारवाई; ६ बड्या हॉटेल्सचे परवाने निलंबित!

admin

admin

Next Post
तुकाराम मुंढे यांची मुंबईतील हॉटेलांवर धडक कारवाई; ६ बड्या हॉटेल्सचे परवाने निलंबित!

तुकाराम मुंढे यांची मुंबईतील हॉटेलांवर धडक कारवाई; ६ बड्या हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

August 14, 2026
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

August 14, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

August 13, 2026
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

August 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,105)
  • गॅलरी (5)
  • जालना (5)
  • ठाणे (481)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,832)
  • मुंबई (3,372)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (57)
  • राष्ट्रीय (502)
  • वसई-विरार (55)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

August 14, 2026
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

August 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी आता कॅमेऱ्याच्या नजरेत! प्रवाशांशी होणारे वाद आणि गैरप्रकार रोखण्यासाठी टीसींना ‘बॉडी कॅमेरे’

August 14, 2026
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण; राज्यभरातून ७७.९७% गणना प्रपत्रे प्रशासनाकडे प्राप्त

August 14, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन

August 13, 2026
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘जिजाऊ’ची सामाजिक बांधिलकी; दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या

August 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION