मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळीला पॅरोलवर सुट्टी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे अरुण गवळीला पुन्हा तुरुंगात जावं लागण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी अरुण गवळीला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पॅरोलवर सुट्टी मंजुर करण्यात आली होती. मात्र, निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
यावेळी अरुण गवळीला पॅरोलवर सुट्टी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अरुण गवळीला धक्का बसला असून पुन्हा तुरुंगात जावं लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता या याचिकेवरील पुढची सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे.