भंडारा : राज्यभरात गेल्या काही काळामध्ये महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आशा दुर्दैवी घटना घडत असतानाच भंडारा जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. भंडारा जिल्ह्यात एका १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरात झोपलेल्या मुलीवर सावत्र बापानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात नात्याला काळिमा फसणारी ही घटना घडली आहे. सावत्र बापानेच घरात झोपलेल्या १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. मुलीने आरोपी बापाविरुद्धह फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली आहे. ही घटना पवनी तालुक्यातील अड्याळ पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.







