मुंबई : राज्यात पुन्हा पावसाचे संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने राज्यात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विदर्भातून केरळपर्यंत हवेची कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
हवेच्या दाबाची ही रेषा विदर्भातून जात आहे. बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहेत. तसेच स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे उंच ढगांची निर्मिती होत आहे. यामुळे पुढील चार दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. सध्या राजस्थानच्या पूर्व भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात शनिवारी हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे.







