• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना; विशेष भरारी पथकाची असणार करडी नजर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती तसेच विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. रात्री उशीरापर्यंत गस्त घालण्यात येणार असून संशयितांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 18, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून ठाणे जिल्ह्यात विशेष उपाययोजना केल्या आहेत. संशयित आणि सराईत आरोपींवर विशेष लक्ष ठेण्यात येणार असून, रात्री उशिरापर्यंत गस्त घालण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात तात्पुरते तपासणी नाके आणि क्यूआरटी पथकाची स्थापना केली असून, विशेष भरारी पथकाची सर्वत्र करडी नजर असणार आहे. जिल्ह्यातील सर्व किरकोळ आणि घाऊक दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. माहिती उत्पादन शुल्कचे ठाणे जिल्हा अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी ही माहिती दिली आहे. ठाणे जिल्ह्यात शिरसाड फाटा (पिवळी), पडघा टोल नाका (भिंवडी), मुंब्रा बायपास टोलनाका येथे प्रत्येकी दहा दुय्यम निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, या तात्पुरत्या तपासणी नाक्यावर नाकाबंदी करून संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. जेणेकरून अवैध मद्य वाहतुकीवर आळा घालता येईल.

अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकींबाबत तक्रार आल्यास तत्काळ कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्कच्या ठाणे कार्यालयात शीघ्र प्रतिसाद पथकाची (क्यूआरटी) स्थापना करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात उत्पादन शुल्कचे एक भरारी पथकासह विभागीय उपायुक्त यांचेही एक भरार पथक अशी दोन फरारी पथके कार्यरत आहेत. या पथकांमार्फत मद्य तस्करी रोखण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. त्याशिवाय, कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांमधून विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामार्फत कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.  विभागीय निरीक्षक आणि त्यांच्या अंतर्गत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये रात्री उशिरापर्यंत गस्त घालून अवैध मद्यविक्री, वाहतुकीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच, मद्य परवानाधारकांकडून नियम, तरतुदी, अटींचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. मद्य तस्करी करणाऱ्या सराईत आरोपींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना विभागीय निरीक्षकांना देण्यात आलेल्या आहेत. या आरोपींवर कलम ९२ अंतर्गत कारवाई करून बंधपत्राचे उल्लंघन झाल्यास आरोपींवर ‘एमपीडीए’ कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व घाऊक आणि किरकोळ दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत अनिवार्य केले असून, त्याचा बॅकअप किमान दहा दिवस ठेवण्याच्या सूचना उत्पादन शुल्ककडून देण्यात आलेल्या आहेत. य़ाकडेही अधिकारी लक्ष ठेऊन असणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्य विक्रेत्यांनी प्रत्येक दिवशी होणारी मद्यविक्रीची माहिती अद्ययावत ठेवण्याचे निर्देश उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. तसेच, ही माहिती विभागीय स्तरावर संकलित करण्याविषयी सर्व विभागीय निरीक्षकांना सांगण्यात आले आहे. जंगलात, खाडीकिनारी किंवा इतर ठिकाणी हातभट्टी लावून दारूची निर्मिती केली जात असून, या हातभट्ट्यांवर उत्पादन शुल्ककडून धाडी टाकून हातभट्ट्या उद्धवस्त केल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही कारवाई आणखीन तीव्र केली जाणार असून, अवैध हातभट्टी आणि मद्य विक्री केंद्रावर विविध अधिकाऱ्यांनी एकत्रित धाडी टाकण्याचे नियोजन केले आहे.

Previous Post

राखीव डब्याबाबतच्या प्रस्तावाला रेल्वे मंडळांची मंजुरी, ज्येष्ठांचा रेल्वेप्रवास होणार सुखकर

Next Post

निवृत्त महिला अधिकाऱ्याची शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

निवृत्त महिला अधिकाऱ्याची शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

September 22, 2026
सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

September 22, 2026
सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,053)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,046)
  • मुंबई (3,490)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

September 22, 2026
सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

September 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

September 22, 2026
सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

September 22, 2026
सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION