• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

admin by admin
September 22, 2026
in पुणे, महाराष्ट्र, मुंबई
0
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीत औरंगाबाद, पुणे आणि नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघ तसेच अमरावती आणि पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. अर्जांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी मतदान होईल, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेषतः पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीतील जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने उमेदवारीवरून पडद्यामागील घडामोडी वाढल्या आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) मंगेश चिवटे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ओएसडी आणि वाडिया महाविद्यालयाचे संचालक प्रा. डॉ. सचिन सानप यांनी एकाच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटींमुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील संभाव्य उमेदवारी आणि भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी मतदारयादीची प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रशासकीय स्तरावर निवडणुकीची तयारी सुरू आहे. चिवटे यांनी सुप्रिया सुळे यांची, तर डॉ. सचिन सानप यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे या हालचालींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटींचा नेमका उद्देश अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेला नसला, तरी शिक्षक मतदारसंघातील उमेदवारी आणि संभाव्य पाठिंब्याबाबत चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघातही महायुतीतील जागावाटपाचा पेच कायम आहे. भारतीय जनता पक्षाकडून शरद लाड, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रताप ऊर्फ भय्या माने यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी माने यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविल्याची चर्चा असली, तरी महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या जागेवर अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात रयत शिक्षण संस्थेसह अनेक मोठ्या शैक्षणिक संस्थांचा प्रभाव असल्याने या निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. रयत शिक्षण संस्थेशी शरद पवार यांचे दीर्घकाळचे संबंध असल्यामुळे पवार कुटुंबाची भूमिका आणि संभाव्य पाठिंबा याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत रयत शिक्षण संस्था, भारती विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरल्याची चर्चा होती. त्या निवडणुकीत जयंत आसगावकर विजयी झाले होते. यंदाही त्यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून त्यांच्या राजकीय समीकरणांमध्ये आमदार सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक यंदा चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Previous Post

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

September 22, 2026
सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

September 22, 2026
सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,053)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,046)
  • मुंबई (3,490)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

September 22, 2026
सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

September 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग

September 22, 2026
सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

सप्टेंबरअखेरीस बँक व्यवहार ठप्प होणार? ३ दिवस देशव्यापी संपाचा इशारा!

September 22, 2026
सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION