• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

admin by admin
September 22, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : जागतिक रोजगाराच्या बदलत्या गरजांनुसार महाराष्ट्रातील युवक-युवतींना कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय ‘स्किल पासपोर्ट’ तयार करावा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम अद्ययावत करावा, तसेच परदेशातील रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलतेवरील एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), राजशिष्टाचार विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट (महिमा) यांनी संयुक्तपणे या परिषदेचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जागतिक स्तरावरील बदलती लोकसंख्या आणि वाढते वृद्धत्व यामुळे कुशल मनुष्यबळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतातील युवा मनुष्यबळाची क्षमता लक्षात घेऊन जागतिक मागणीशी कुशल मनुष्यबळाची प्रभावी सांगड घालावी लागेल. त्यातून ‘सर्क्युलर मोबिलिटी ऑफ टॅलेंट’ ही संकल्पना अधिक सक्षम होईल आणि महाराष्ट्र या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल.

भारताने सुमारे २८ देशांसोबत कामगार गतिशीलतेसंदर्भात करार केले आहेत. या देशांमध्ये अभियांत्रिकी, आरोग्यसेवा, बांधकाम आणि विविध तांत्रिक क्षेत्रांतील कुशल मनुष्यबळाला मोठी मागणी आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या ‘फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२५’नुसार २०३० पर्यंत जगभरात सुमारे १७ कोटी नवीन रोजगार निर्माण होतील, तर सुमारे ९ कोटी २० लाख रोजगार विस्थापित होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय कार्यबल गतिशीलतेच्या क्षेत्रात पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विविध देशांच्या मनुष्यबळ विषयक गरजांची माहिती प्रशिक्षण संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी भरती संस्थांच्या अनुभवाचा उपयोग करावा. पारंपरिक प्रशिक्षणासह डिजिटल आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा संमिश्र वापर करावा. ऑनलाइन भाषा प्रशिक्षणासाठी निश्चित कालावधी, किमान चाचण्या तसेच डिजिटल भाषांतर आणि अर्थानुवाद साधनांचा उपयोग करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्य शासनाच्या धोरण मसुद्यात कौशल्य विकास, जागतिक मागणीनुसार प्रशिक्षण, भाषा प्रशिक्षण, प्रमाणपत्र, कागदपत्रांसाठी सहाय्य आणि प्रस्थानपूर्व मार्गदर्शनाला प्राधान्य दिले आहे. परदेशातून परतलेल्या कुशल मनुष्यबळाला राज्यातील उद्योगांशी जोडण्यावरही शासन भर देईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील युवक-युवतींना परदेशातील रोजगार संधी सुलभ व्हाव्यात आणि भाषिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाचा डिजिटल इंडिया भाषिणी, मित्रा आणि महिमा यांच्यात सामंजस्य करार झाला. भाषांतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमेदवारांना परदेशी आणि व्यवसायनिहाय भाषांचे मोफत व सुलभ प्रशिक्षण मिळणार असून, या प्रायोगिक प्रकल्पाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांना लाभ होईल. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलता ही केवळ मनुष्यबळाच्या स्थलांतराची प्रक्रिया नसून कौशल्य, गुंतवणूक, प्रवासी भारतीय समुदाय आणि जागतिक बाजारपेठेला जोडणारी आर्थिक भागीदारी आहे. मुंबईतील परदेशी वाणिज्य दूतावासांचे नेटवर्क, उद्योग, विद्यापीठे आणि कौशल्य विकास संस्थांचा समन्वय साधून महाराष्ट्रातील प्रतिभेला जागतिक संधींशी जोडण्यात येईल. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, जागतिक रोजगारासाठी आवश्यक कौशल्य आणि भाषा प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना संबंधित देशातील स्थानिक संस्कृतीशी समरस होण्यासाठी सक्षम करण्यावर शासन भर देत आहे. परदेशात जाणारे कामगार महाराष्ट्र आणि संबंधित देशांमधील मैत्री अधिक दृढ करणारे दूत म्हणूनही भूमिका बजावतील. यावेळी जर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्टॉफ हेलियर, जपानच्या सातो हितोमी, फ्रान्सचे पॅट्रिक लिवेरिनो, रशियाचे इव्हॉन पेटीसोव, इंग्लंडचे जॉन निकेली, ‘मित्रा’चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे अपर मुख्य सचिव निरंजन कुमार सुधांशू, राष्ट्रीय कौशल्य मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुणकुमार पिलाई, आयुक्त डॉ. अमित सैनी, राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजेश गवांडे, ‘मित्रा’चे सहसचिव अमन मित्तल आणि आंतरराष्ट्रीय रोजगार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous Post

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

Next Post

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

admin

admin

Next Post
सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,126)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,052)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,044)
  • मुंबई (3,488)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (538)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

September 22, 2026
महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

महाराष्ट्राचा युवक घडवणार जगभरात ओळख; २८ देशांशी करार, ‘स्किल पासपोर्ट’द्वारे मिळणार हक्काचा रोजगार!

September 22, 2026
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा सरसावला; ‘हर घर जल’ अभियानांतर्गत नळ जोडणीचे काम युद्धपातळीवर!

September 21, 2026
शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

शिक्षिकेचा क्रांतीकारी पुढाकार! तृतीयपंथीयांना शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू केले खास अ‍ॅप

September 21, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION