भारतीय संघासाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे, टीम इंडीयाने पहिल्या दिनी ३५९ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडे अजुनही ७ विकेट्स हातामध्ये शिल्लक आहेत. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि रिषभ पंत हे दोघे सध्या फलंदाजी करत आहेत. भारताचा संघ आज फलंदाजी करुन किती धावसंख्या उभारेल याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. भारताच्या दोन खेळाडूंनी शतक पुर्ण केले आहे. शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी संघासाठी शतक झळकावले. त्याचबरोबर केएल राहुल आणि रिषभ पंत या दोघांनी देखील संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस , ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने विचारले की या डावात तिसरा शतक करणारा कोण असेल? खरंतर, लीड्समध्ये सुरू असलेला हा सामना पाहून सचिन तेंडुलकरला २००२ च्या हेडिंग्ले कसोटीची आठवण झाली जेव्हा त्याच्यासोबत आणखी दोन भारतीय खेळाडूंनी शतके झळकावली होती. हा तोच सामना आहे जेव्हा भारताने लीड्सच्या मैदानावर शेवटच्या वेळी ब्रिटिशांना पराभूत केले होते.







