मुंबई : मशिदीवरून भोंगे खाली आलेच पाहिजेत, असे बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या सभांमधून अनेकदा सांगितले होते. ती गोष्ट जर राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे अडवा येतोच कसा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल करता, आम्हाला तुमचा कल कळलाय, कुठे आहे तो? असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. ते शिवडीमधील सभेत बोलत होते. मशिदीवरील भोंगे खाली आणायला सांगितले. आले पण खाली. बंदही झाले. एक वेळ आम्ही बंद करतो पण हनुमान चालीसा बोलू नका. उध्दव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते. सगळे बंद झाले, १७ हजार माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्या. कारण हनुमान चालीसा बोलणार होते. सुरक्षा कोणाला तर भोंग्याला, अशी टीकाही राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून केली.
फक्त मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांच्याविरोधात निवडणुका लढवल्या, त्यांच्यासोबत जाऊन बसले. तुम्हाला कुणाला सांगितलं, विचारलं का? तुमच्या मताचा हा अपमान वाटत नाही? काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून युतीला मतदान केलं. निकालानंतर एक पक्ष ज्यांच्याविरोधात निवडणुका लढवल्या, त्याच्यासोबत जाऊन बसतो. हे कोणतं राजकारण आहे, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. देशाच्या आजपर्यंत अशी गोष्ट पाहिलीच नाही. ज्यांच्याविरोधात निवडणूक लढवली, निकालानंतर त्यांच्याबरोबर जाऊन बसले. या सगळ्या गोष्टी जातीमधून तुम्हाला विसरायला लावतात, असे राज ठाकरे म्हणाले. राहुल गांधी येडपट आहे. महाराजांची प्रतिमा घ्यायला पण लाज वाटते, त्यांच्यासोबत जाऊन हे बसले. एका माणसाने अख्या पक्षाची वाट लावली. जे लोक निघून गेले त्यांना गद्दार म्हाणता पण गद्दार तर हे आहे जो घरात बसला, असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर लगावला.
राज ठाकरे काय म्हणाले ?
बाळा नांदगावकर यांना व्हीलचेअर वर पाहून जय प्रकाश नारायण यांची आठवण झाली.
दोन दिवसापूर्वी माझी तब्येत बिघडली. मला बोलता येत नव्हतं.
शिवसेना आणि भाजपचे आभार की त्यांनी बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिला.
खर तर हे आभार अनेक ठिकाणी मागता येऊ शकत होते पण जाऊ दे.
अत्यंत वाईट स्थिती महाराष्ट्रात आहे. अनेक विषय आहेत. ते सोडवले नाहीत, म्हणून तुमचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून दुसऱ्या गोष्टींची सोय केली.
हिंदुत्वने भारावलेल्या महाराष्ट्रात वाद निर्माण करायचे काम शरद पवार यांनी केलं.
राजकीय पक्ष मेले तरी चालेल पण महाराष्ट्र जगाला पाहिजे.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जे राजकारण चालत ते इथे होऊ नये.