• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

राजकीय खडाजंगीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा ३५ कोटींचा विकास निधी पुन्हा शासनाच्या तिजोरीत

भाजपप्रणीत प्रमुख ठेकेदारांना त्यांनी काम केलेल्या देयकांचे सुमारे ९० टक्के निधी देण्यात आला असताना शिवसेनाप्रणीत ठेकेदारांना मात्र केलेल्या कामाचा एकही पैसा मिळाला नसल्याचे आरोप या वेळी करण्यात आले.

admin by admin
April 3, 2025
in पालघर, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाला विकासकामांसाठी ३१ मार्च रोजी उपलब्ध झालेल्या ५१.७२ कोटी रुपयांपैकी तब्बल ३५.३५ कोटी रुपयांचा निधी खर्च न होऊ शकल्याने हे पैसे शासनाच्या तिजोरीत पुन्हा जमा झाले आहेत. तर जी कामे झाली आहेत त्याची देयके युतीच्या घटक पक्षाशी संबंधित ठेकेदारांना देताना भेदभाव झाल्याचा आरोप करत भाजप, शिवसेनेत राजकीय खडाजंगी होण्याचा प्रकार या वेळी घडला. पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पालघर व जव्हार विभागाकडून हाती घेण्यात आलेल्या विविध विकासकामांसाठी ३१ मार्च रोजी ७६.९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यापैकी जव्हार विभागाला ५१.७२ कोटी रुपये मंजूर होते. मंजूर करण्यात आलेल्या देयकांचा तपशील ३१ मार्च रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान संकेतस्थळावर झळकला. यामध्ये विक्रमगड मतदारसंघातील भाजपप्रणीत ठेकेदारांना झुकते माप देण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनाप्रणीत ठेकेदारांनी जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर या वेळी धुडगूस घातला.

भाजपप्रणीत प्रमुख ठेकेदारांना त्यांनी काम केलेल्या देयकांचे सुमारे ९० टक्के निधी देण्यात आला असताना शिवसेनाप्रणीत ठेकेदारांना मात्र केलेल्या कामाचा एकही पैसा मिळाला नसल्याचे आरोप या वेळी करण्यात आले. राज्य सरकारने मित्रपक्षांच्या ठेकेदारांमध्ये भेदभाव केल्याने अनेक ठेकेदारांनी वरिष्ठांपर्यंत तक्रारी केल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर जुलै २०२४ मध्ये मंजूर झालेल्या सुमारे १० लाख किमतीची ७० कामे करणारे अनेक सत्ताधारी पक्ष कार्यकर्त्यांना या निधी वाटपात ठेंगा दाखवण्यात आल्याने त्यांच्यामध्येदेखील नाराजीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या आवारात प्रलंबित देयक असणाऱ्या ठेकेदारांनी एकच गर्दी केली होती. देयक मंजूर झालेल्या ठेकेदारांमध्येदेखील आपली बिले लवकर अदा करण्यात यावी यासाठी चढाओढ सुरू असल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदारांची बिल मंजूर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर शब्द टाकल्याचे आरोप होत असताना भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी मात्र सर्वपक्षीय ठेकेदारांना समान पद्धतीने उपलब्ध झालेल्या निधीचे वाटप करण्यासाठी आग्रह धरल्याचे सांगितले जात होते.

देयके देण्यावरून झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाबाबत जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांच्याशी संपर्क साधला त्यांनी झालेल्या कामांची देयके अदा करण्याबाबत तपशील उपलब्ध झाल्याने व त्यातच इंटरनेटची समस्या उद्भवल्याने देयके अदा करण्याच्या कामाला गती प्राप्त झाली नाही. सायंकाळी साडेसहा ते साडेआठ दरम्यान संकेतस्थळ धिम्या गतीने सुरू होते. कामासाठी तीन संगणकांचा वापर असतानादेखील तांत्रिक कारणामुळे ३५ कोटी रुपयांचा निधी अदा करता आला नाही असे सांगितले. तर राज्य सरकारकडे ४०० कोटींपेक्षा अधिक देयके मंजुरी व निधी वितरणासाठी पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. वाडा तालुक्यातील देयके अदा करण्यासाठी असणाऱ्या संघटनेमध्ये तांत्रिक अडचण झाल्याने सर्वाधिक फटका त्या भागातील ठेकेदारांना बसला हे मान्य करताना दुर्गम भागात इंटरनेटची व्यवस्था तसेच मनुष्यबळाची मर्यादा असल्याने अडचणी निर्माण झाल्याचे भोये यांनी सांगितले.

Previous Post

नाशिक पोलीस परिमंडळ दोनचा उपक्रम; ६० तक्रारदारांना चोरीस गेलेला मुद्देमाल केला परत

Next Post

वसई विरार महापालिकेने चालू आर्थिक वर्षात तब्बल ३९२ कोटी मालमत्ता कराची केली वसुली

admin

admin

Next Post

वसई विरार महापालिकेने चालू आर्थिक वर्षात तब्बल ३९२ कोटी मालमत्ता कराची केली वसुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION