पुणे : पुणे हे विध्येचे माहेरघर समजले जात होते परंतु आता ते गुन्हेगारीचे माहेरघर समजले जात आहे. गुन्हेगारीचे प्रमाण दिवसांदिवस वाढतच चालले आहे. परंतु यालाच चाप बसवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कंबर कसली आहे. अवैध धंदे आणि यामुळे निर्माण होणारी गुन्हेगारी प्रवृतीचा समूळ नष्ट करण्यासाठी पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या लोकांचे धाबे दणाणले आहेत. अशीच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. त्या छाप्यातून वाचण्यासाठी एका व्यक्तीने इमारतीवरून उडी घेतली आहे. या घटनेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पुण्यामधील नाना पेठेत एका इमारतीत मोठ्या प्रमाणात जुगार सुरू आहे. गुन्हे शाखेच्या टीमने बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता.
या टाकलेल्या छाप्यातून वाचण्यासाठी एका इसमाने पोलिसांना घाबरून थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेत संबंधित इसमाचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ब्रायन रुडॉल्फ गियर असे त्या मृत इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेमधील लाजवंती नामक लॉजमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट -१ च्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला होता. छापा टाकता दरम्यान पोलिसांनी प्रथमत: दरवाजा वाजवला असता एकाने दरवाजा उघडला. मात्र दरवाजामध्ये पोलीस समोर दिसताच त्याने पुन्हा दरवाजा बंद केला आणि पळत आत जात बसलेल्यांना लोकांना पोलीस आल्याची माहिती दिली. छाप्याच्या वेळी जुगारी व पोलिसांमध्ये पळापळ आणि धरपकड सुरु झाली. याचदरम्यान एका जुगाऱ्याने पोलिसांच्या हातून निसटण्यासाठी ब्रायन याने भितीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली आहे. यामुळे तो जागीच बेशुद्ध पडला, त्यामुळे काही काळ तेथे तनाव निर्माण झाला होता, पोलिसांना हे लक्षात येताच त्यांनी ताबडतोब ब्रायनला ताब्यात घेतले आणि पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना ब्रायनचा रात्री एकच्या सुमारास मृत्यू झाला आहे. दरम्यान या जुगार अड्डावरील छाप्यात जुगार खेळणाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.