मुंबई : परदेशातून पाठवण्यात आलेले चरस व प्रतिबंधित गोळ्यांच्या तस्करीप्रकरणी उमर सिद्धीक दायगोली या आरोपीला अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अटक केली. आरोपीविरोधात लुक आऊट सर्क्युतर जारी करण्यात आले होते. त्याद्वारे त्याला अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
२०१९ मध्ये कुवेतवरून आलेल्या कुरियरमध्ये तीन किलो चरस व प्रतिबंधिक गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्याप्रकरणात उमरला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.