वृत्तसंस्था : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी पुण्यातील नाम फाउंडेशनच्या कार्यक्रमात नाटक आणि सिनेमातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. एका दशकापासून नाना पाटेकर यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवलेली आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. आता नेमकं नाना पाटेकर यांनी निवृत्तीबद्दल काय संकेत दिलं नेमकं काय बोलले आहेत, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
गणेश कला क्रीडा मंचावर नानांनी उपस्थितांशी अनौपारिक संवाद साधला. ते यावेळी म्हणाली की, आजवर खूप काम केलं. आता मनासारखं जगावंस वाटतंय. एक जानेवारीला मी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करणार आहो. त्यानंतर नाटक, सिनेमातून निवृत्त होऊन गावखेड्यांतील विवंचना समजून घ्याव्यात, त्यांच्यासाठी काही करावं असं वाटतं. ते पुढे म्हणालेत की, पंचाहत्तरीनंतर नाटक, सिनेमातून निवृत्त व्हावे, असं वाटतं. म्हणजे ज्यातून तुम्हाला खूप काही सांगता येईल, अशी एखादी छान कलाकृती वाट्याला आली, तर ती करीनही, पण आता मला माझ्या पद्धतीने जगू द्या.







