मुंबई : मुंबई एअरपोर्टवरील विमानांचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन एअरपोर्टला दि. बा. पाटील असे नाव देण्याची मागणी होत आहे. मुंबईकर जनतेची हि मागणी पूर्ण करण्यात यावी; अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत केली आहे.
भारतीय आर्युमान विधेयक २०२४ वर बोलताना खासदार वायकर यांनी सदरची मागणी केली आहे. नवी मुंबई येथे नवीन एअरपोर्ट तयार करण्यात येत आहे. हे एअर पोर्ट कधीपर्यंत तयार होणार याबाबतची स्पष्टता द्यात नाही. या एअरपोर्टचे काम कधी पूर्ण होणार? जनतेच्या मागणी नुसार या एअरपोर्टला दि. बा. पाटील नाव देण्याचा जो प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे, तो मंजूर करून एअरपोर्टला दि. बा. पाटील नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाच्या विकासासाठी प्राधान्य द्यावे, अशी विनंती देखील केली आहे.