मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती विमानतळावर झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज्याच्या राजकारणातील मोठा चेहरा म्हणून अजित पवार यांच्याकडे बघितले जात होते. काका शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊन भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासोबत मिळून अजित पवार यांनी सत्ता स्थापन केली होती. हे विमान मुंबईहून बारामतीला येत असताना सकाळी अंदाजे ८:४५ ते ९:०० च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करताना दुर्घटनाग्रस्त झाले. लँडिंगदरम्यान वैमानिकाचे नियंत्रण सुटल्यामुळे विमान धावपट्टीवर कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, विमानातील अजित पवार यांच्यासह सर्व ६ जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन वैमानिक आणि त्यांचे कर्मचारी यांचा समावेश होता. हे एक खासगी ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) प्रकारचे विमान होते. अजित पवार बारामतीमध्ये नियोजित चार जाहीर सभांसाठी जात असताना हा अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून अधिकृत तपास सुरू आहे.
बारामतीमध्ये सकाळी सभा असल्याने अजित पवार मुंबईहून भल्या पहाटे निघाले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर अजित पवार यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर लोकांना मोठा धक्का बसला असून कार्यकर्त्ये रडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या विमानाचा अपघातात ज्याठिकाणी झाला, त्याठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांच्या मृत्यूने राज्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने बारामतीकडे सध्या धाव घेत आहेत. या अपघाताबद्दल सध्या तपास केला जात आहे.







