वृत्तसंस्था : KGF आणि सलारसारख्या चित्रपटांचे सह दिग्दर्शक कीर्तन नादगौडा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कीर्तन नादगौडा यांचा ४ वर्षीय मुलगा सोनारशचा लिफ्टमध्ये अडकल्याने मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दु:खद माहिती देत, शोक व्यक्त केला आहे. कीर्तन नादगौडा यांच्या मुलाचं निधन झाल्याच्या वृत्ताला त्यांना दुजोरा दिला आहे.
पवन कल्याण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कीर्तन नादगौडा यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “दिग्दर्शक श्री कीर्तन नादगौडा यांच्या मुलाच्या निधनाची बातमी मनाला हेलावणारी आहे, तेलुगु आणि कन्नडमधून दिग्दर्शनात पदार्पण करणारे कीर्तन यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खाने मीदेखील त्रस्त आहे. श्री कीर्तन आणि समृद्धी पटेल यांचा मुलगा चिरंजीवी सोनारश नादगौडाचं निधन झालं आहे”.







