वृत्तसंस्था : पाकिस्तानमध्ये नमाज पठण सुरू असताना मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. सांगितले जात आहे की हा स्फोट जुम्मानिमित्त नमाज पठाण सुरू असताना झाला. यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. इस्लामाबादच्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये असलेल्या मस्जिदमध्ये नागरिक नमाजाचे पठण सुरू होते. त्याचवेळी एक मोठा स्फोट झाला. आंतराष्ट्रीय मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, या ब्लास्टमध्ये शिया मस्जिदला टार्गेट केलेय. पण पोलिसांनी हा आत्मघातकी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यानंतर इमरजेंसी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या राजधानीमध्ये भयंकर बॉम्ब स्फोट झाला. इस्लामाबादच्या शिया मस्जिदमध्ये सुसाइड बॉम्बने ब्लास्ट केला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून इमरजेंसी अलर्ट जारी केला आहे. या हल्ल्यामध्ये अनेक अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा आकडा अजून समोर आला नाहीये. या भीषण बॉम्ब स्फोटचे आता व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहे. यामध्ये दिसत आहे की मस्जिदचा एक भाग पूर्णपणे ढासळला असून चारही बाजूने शरीराचे तुकडे पडले आहे.







