• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

वयोवृद्ध महिलेची लाखोंची तोतया डॉक्टरकडून शस्त्रक्रियेच्या नावाखाली फसवणूक

ओळखपाळख नसलेल्या व्यक्तीकडून मिळालेल्या संपर्क क्रमांकावरून डॉक्टरशी संवाद साधत उपचार करून घेण्याचा प्रकार अंधेरीतील ६१ वर्षीय महिलेच्या अंगलट आला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 6, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : एका तोतया डॉक्टरने गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करून दिल्याचा बनाव रचत वृध्द महिलेकडून लाखो रुपये उकळल्याची घटना अंधेरीत उघडकीस आली आहे. या तोतया डॉक्टरसह त्याच्या साथीदाराविरोधात या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी महिलेकडून सव्वा सात लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. ओळखपाळख नसलेल्या व्यक्तीकडून मिळालेल्या संपर्क क्रमांकावरून डॉक्टरशी संवाद साधत उपचार करून घेण्याचा प्रकार अंधेरीतील ६१ वर्षीय महिलेच्या अंगलट आला. डॉ. झफर मर्चंट हा तोतया डॉक्टर आणि त्याचा सहकारी विनोद गोयल यांनी मिळून २०२१च्या नोव्हेंबरमध्ये या महिलेची आणि तिच्या कुटुंबाची फसवणूक केली होती. मात्र तीन वर्षांनंतर या प्रकरणी तक्रारदार महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

२०२१ मध्ये तक्रारदार महिला त्यांच्या आईला घेऊन दंत चिकित्सेसाठी गेल्या असताना तिथे त्यांची ओळख आरोपी विनोद गोयलबरोबर झाली. त्यावेळी गोयलशी बोलताना महिलेने आईला गुडघ्यामध्येही प्रचंड वेदना होत असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपीने एका डॉक्टरचा संपर्क क्रमांक दिला आणि उपचार घेण्याचा सल्ला दिला, असे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आहे. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या आईने दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला असता संबंधित व्यक्तीने आपली ओळख डॉ. झफर मर्चंट अशी करून दिली. त्याने तक्रारदार महिलेचा घराचा पत्ता घेतला आणि तिथे जाऊन गुडघ्याची साधी शस्त्रक्रिया केली. त्याने दोन्ही गुडघ्यांवर कापून त्यातून रक्त काढले. ते रक्त एका कागदावर पसरवले. त्यावर हळद लावली आणि नंतर कागद फेकून दिला. त्यानंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे असे सांगत आईच्या गुडघ्याचा त्रासही दूर झाल्याचे सांगितले. शिवाय, उपचारासाठी सात लाख २० हजार रुपये शुल्क मागितले. तक्रारदार आणि तिच्या आईने सव्वा सात लाख रुपये रोख रक्कम म्हणून दिले. शस्त्रक्रियेनंतरही आईला गुडघ्यात वेदना होऊ लागल्या, म्हणून त्यांनी डॉ. मर्चंटशी पुन्हा संपर्क साधला. मात्र, त्याचा फोन बंद होता. त्यांनी विनोद गोयलला दूरध्वनी केला, त्यानेही त्यावेळी खोटी आश्वासने दिली. नंतर मात्र दोन्ही आरोपींनी तक्रारदारांच्या कुटुंबियांचे दूरध्वनी उचलणे बंद केले. त्याच दरम्यान तक्रारदार महिलेची सासू व सासऱ्यांचे निधन झाल्यामुळे त्या तत्काळ तक्रार देऊ शकल्या नाही. त्यानंतर डॉ. मर्चंटने पश्चिम उपनगरातील इतर वृद्ध नागरिकांना देखील याच पद्धतीने फसवल्याचे वृत्त तक्रारदार महिलेने वाचले. अखेर दोन महिने प्रतीक्षा केल्यानंतर त्यांनी मंगळवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी डॉ. मर्चंटविरुद्ध भारतीय दंड संहिता ४१९ (तोतयागिरी) आणि ४२० (फसवणूक) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी व्यक्तींची फसवणूक केली असल्याचा संशय आहे.

Previous Post

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी पुण्यातून आणखी एका आरोपीला अटक

Next Post

उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर; महिला, शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर; महिला, शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,021)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,740)
  • मुंबई (3,311)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

‘अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; मुंबईत ३० जुलैपासून राज्यव्यापी नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 29, 2026
एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड सक्तीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

July 29, 2026
पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

पुण्यात पाऊल ठेवताच तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन प्लॅन; लाखोंची भेसळयुक्त चिक्की-सोनपापडी केली नष्ट!

July 29, 2026
२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

२८ ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्रे द्या, अन्यथा २९ ऑगस्टपासून निर्णायक लढाई; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

July 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION