वृत्तसंस्था : जगप्रसिद्ध प्रीमियम चॉकलेट ब्रँड फेरेरो रोशरने भारतीय चॉकलेटप्रेमींसाठी मोठी भेट आणली आहे. आतापर्यंत आपल्या खास गोलाकार चॉकलेटसाठी ओळखला जाणारा फेरेरो रोशर आता प्रथमच चॉकलेट बार स्वरूपात भारतीय बाजारात दाखल झाला आहे. फेरेरो इंडियाने क्लासिक हेझलनट आणि ७० टक्के कोको हेझलनट या दोन प्रीमियम व्हेरिएंट्समध्ये नवीन बार लाँच केले आहेत. या बारमध्ये फेरेरो रोशरची सिग्नेचर चव, स्मूथ चॉकलेट, क्रीमी फिलिंग आणि कुरकुरीत हेझलनट्सचा संगम अनुभवायला मिळणार आहे. बारचे डिझाइनही खास ठेवण्यात आले असून, प्रत्येक तुकड्यावर फेरेरो रोशरच्या प्रसिद्ध चॉकलेटची आठवण करून देणारे टेक्सचर आणि डोम पॅटर्न तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना पारंपरिक चवीसोबत नवा आणि मल्टी-लेअर चॉकलेट अनुभव मिळणार आहे.
हे प्रीमियम चॉकलेट बार ९० ग्रॅम पॅकमध्ये उपलब्ध असून, प्रत्येक बारची एमआरपी ₹४९९ निश्चित करण्यात आली आहे. सुरुवातीला हे बार ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट यांसारख्या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून, त्यानंतर देशातील प्रमुख मॉडर्न ट्रेड आणि प्रीमियम स्टोअर्समध्ये विक्रीसाठी येतील. फेरेरो इंडियाने दिवाळीसह आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन हे उत्पादन बाजारात आणले आहे. या लाँचसाठी “फेरेरो रोशर आता बार स्वरूपात” ही विशेष मोहीम राबवली जाणार असून, अभिनेता हृतिक रोशन या प्रचार मोहिमेचा चेहरा असणार आहे. प्रीमियम चॉकलेट आणि गिफ्टिंग सेगमेंटमध्ये या नव्या उत्पादनामुळे स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






