मुंबई : विधानसभेनंतर आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकाचा धुराळा उडणार आहे. एकीकडे भाजप आणि ठाकरे गट एकत्र येण्याचे संकेत मिळत असताना राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. पुढील दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, याचे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत आहेत. शिर्डीमध्ये होत असलेल्या भाजपच्या राज्य महाअधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधन केलं. यावेळी त्यांनी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांविषयी विधान केलंय. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. राजकारणात भाजप आणि ठाकरे गट एकत्र येण्याची नांदी वाटत असतानाच राज्यातील स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच जाहीर केल्या जातील, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधान करताना भाजपच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना दिल्या आहेत. ज्या पद्धतीने विधानसभेत महायुतीने विजय मिळवलाय, तसाच विजय आपल्याला या निवडणुकांमध्ये मिळवायचा आहे, असं फडणवीस म्हणालेत. महाअधिवेशनापुर्वी भाजपने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी महाविजय ३.० अभियान सुरू केलं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जिल्ह्याध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. आता कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश शिर्डीत दिलेत. शिर्डीतील महाअधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं. महाराष्ट्रातील जनतेने भाजपला शंभरपेक्षा जास्त जागा जिंकून दिलंय. इतक्या जागा जिंकणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त भाजप पक्ष आहे. ज्या राज्यात भाजपने तिनदा विजय मिळवलाय,त्या राज्यांची यादीत आता महाराष्ट्राचा समावेश झालाय. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप महाराष्ट्रात जेमतेम काठावर पास झाला होता. पास जरी झालो असलो तरी मनातून आपण नापास होतो, पण त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काम केलं. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली आपण जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. त्यामुळे राज्यातील २८८ जागांपैकी २३७ जागा जिंकून मोठा विजय मिळवला. मोठा विजय मिळवत भाजपने विधानसभेत ८९ टक्के गुण मिळवले आहेत. भाजपने विधानसभेत इतिहास घडलवलाय.
महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर ते आतापर्यंत लागलेल्या निकालात सत्ताधारी पक्षांनी मिळालेल्या जागांपैकी सर्वाधिक जागा भाजपने यावेळी जिंकल्या आहेत. एखाद्या सत्तेतील पक्षाने २२२ जागा जिंकल्या होत्या पण भाजपने यावेळी २३७ जागा जिंकत विक्रम स्थापन केलाय, असंही मुख्यमंत्री म्हणालेत. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमुळे भाजपने हा विजय मिळवला. कार्यकर्ते पार्थ होते तर पंतप्रधान मोदी यांनी माधवाची भूमिका बजावल्याने भाजपचा विजय झाला.