लोणावळा : गेले अनेक दिवस विजेच्या लपंडाव मुळे नागरिकांना शेतीच्या कामाचा, पिण्याचा पाण्याचा अनेक समस्या मुळे त्रस्त झाले आहेत विजेच्या अश्या लपंडाव असल्या कारणाने कामे खोळबळी असून नागरिक, शेतकरी, व्यावसायिक आर्थिक व मानसिक विवनचनेतून जात आहेत, या करिता काँग्रेस युवक च्या वतीने निवेदक देऊन हा भोंगळ कारभार थांबवण्याची विंनती केली आहे व इशारा ही देण्यात आला आहे मावळ भागात अनेक ठिकाणी वादळ वाऱ्या मुळे विजेच्या वायरी खूप खाली आल्या आहेत त्या मुळे मोठा अपघात होऊ शकतो मनुष्य किव्हा जनावर जीवित हानी होऊ शकते या करिता त्वरित या वर उपाय योजना करणे आवश्यक आहे या निवेदनावर युवक काँग्रेस च्या राजेश वाघोले या सह माजी अध्यक्ष गणेश कांबळे, सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष विशाल वाळुंज सरचिटणीस किरण मोकाशी उपाध्यक्ष अभय जाधव देहूरोड अध्यक्ष मलिक शेख,गफूर शेख, पवन गायकवाड निनाध हरकुडे, रोहित नरवडे यांच्यावतीने महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यासोबत महावितरण अधिकारी कर्मचारी नागरिकांची तकरीकडे दुर्लक्ष करीत आहेत यासोबत काही ठिकाणी डीपी,बॉक्स सुस्थितीत नाहीत विज बिल वेळेवर भेटत नाहीत, शेतीच्या मोटरीची बिल अवाढव्य प्रमाणे येत आहेत या वर गांभीर्याने लक्ष देण्याचे आवश्यकता आहे अशी मागणी तालुकाध्यक्ष राजेश वाघोले यांनी केली आहे.