मुंबई : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टान मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहाच्या कस्टडीतून सुटका करण्यात आली आहे. मुंबई हायकाटनि या मुलाला दिलासा दिला आहे. या मुलाची कस्टडी त्याच्या आत्याकडे देण्यात आली आहे.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलीने पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. या दोघांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणातील रस्त्यावर भरधाव कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला हायकोटनि मोठा दिलासा दिला आहे. पुणे पोलिसांनी जामिनानंतर पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचे मुंबई हायकोटनि म्हटलं. त्यानंतर या अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. मुलाची आत्या पूजा यांनी हेबियस कॉर्पसअंतर्गत कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने स्वीकारली. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने अल्पवयीन मुलाची कस्टडी त्याच्या आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाने अल्पवयील आरोपीला दिलासा मिळाला आहे.