नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने त्यांची लोकप्रिय एमकॅश सेवा ३० नोव्हेंबर २०२५नंतर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ऑनलाइन एसबीआय आणि लाइट अॅपद्वारे पैशांची देवाणघेवाण आणि क्लेम करण्याची सुविधा संपेल. जे खातेदार फक्त मोबाइल नंबर किंवा ईमेलद्वारे त्वरित पैसे पाठवत होते, त्यांना आता नवीन पर्याय शोधावे लागतील. बँकेने वेबसाइटवर नोटीस जारी करून ग्राहकांना सुरक्षित डिजिटल मार्गांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.
३० नोव्हेंबर २०२५ नंतर एमकॅश सेवा पूर्णपणे बंद होईल. ऑनलाइनएसबीआय आणि योनो लाइट अॅपद्वारे पैसे पाठवणे व क्लेम करणे शक्य राहणार नाही. एमकॅश बंद झाल्यावर यूपीआय (भीम एसबीआय पे), आयएमपीएस (२४ तास त्वरित), एनईएफटी (दिवसभर बॅच) आणि आरटीजीएस (मोठ्या रकमेसाठी) हे सुरक्षित पर्याय वापरा. ही सेवा जुनी तंत्रज्ञानावर आधारित होती आणि यूपीआयसारख्या आधुनिक पद्धतींमुळे ती अप्रासंगिक झाली. त्यामुळे एसबीआय डिजिटल रूपांतरासाठी बंद करत आहे.






