मुंबई : उन्हाळी सुट्टीतील प्रवासी गर्दी नियंत्रणासाठी (०११८७/८) लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीदरम्यान १६ साप्ताहिक विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वेने घेतला आहे. १८ एप्रिल ते ७ जूनदरम्यान ही गाडी धावणार आहे.
ही गाडी एलटीटीहून दर गुरुवारी रात्री १०.१५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ९.५० वाजता थिवी येथे पोहोचेल. ही विशेष गाडी २२ डब्यांची असून ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी या स्थानकांवर थांबणार आहे. थांब्यांबाबत सविस्तर माहितीसाठी मध्य, कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.