मुंबई : राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून तब्बल ४७ लाख ६० हजार रुपये चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, चेक आणि स्वाक्षऱ्यांद्वारे आरोपींनी चार टप्प्यांत ही रक्कम काढली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या विभागातील अधिकाऱ्यांनी मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिक्षण विभागाचे सरकारच्या इतर विभागांप्रमाणे मंत्रालयातील बँकेत खाते आहे. दैनंदिन व्यवहारासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग या खात्याचा वापर करतात. बँक खात्याचे बहुतांश व्यवहार हे चेकच्या माध्यमातूनच केले जातात. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी खात्यातील व्यवहारांची पडताळणी केली असता, ४७ लाख ६० हजार रुपयांचा ताळमेळ जमत नव्हता. अधिक पडताळणी केल्यावर ही रक्कम नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यांवर पाठवण्यात आल्याचे आणि या खातेदारांनी टप्प्याटप्प्याने रक्कम काढल्याचे समोर आले. ही सर्व बँक खाती कोलकाता येथील आहेत. शिक्षण विभागातील तपशीलानुसार, अशा कोणत्याच व्यक्तींच्या नावांनी चेक देण्यात आलेले नाहीत.
शिक्षण विभागाचे सरकारच्या इतर विभागांप्रमाणे मंत्रालयातील बँकेत खाते आहे. दैनंदिन व्यवहारासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग या खात्याचा वापर करतात. बँक खात्याचे बहुतांश व्यवहार हे चेकच्या माध्यमातूनच केले जातात. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी खात्यातील व्यवहारांची पडताळणी केली असता, ४७ लाख ६० हजार रुपयांचा ताळमेळ जमत नव्हता. अधिक पडताळणी केल्यावर ही रक्कम नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यांवर पाठवण्यात आल्याचे आणि या खातेदारांनी टप्प्याटप्प्याने रक्कम काढल्याचे समोर आले. ही सर्व बँक खाती कोलकाता येथील आहेत. शिक्षण विभागातील तपशीलानुसार, अशा कोणत्याच व्यक्तींच्या नावांनी चेक देण्यात आलेले नाहीत. सरकारच्या बँक खात्यामधून अशा प्रकारे रक्कम काढल्याने अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार फसवणूक, तसेच इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांच्या नावावर बँक खाती आहेत, त्या व्यक्ती नेमक्या कोण आहेत आणि त्यांना पैसे काढण्यासाठी कुणी मदत केली, याचा शोध पोलिस घेत आहेत. शिक्षण विभागाप्रमाणे पर्यटन विभागालाही असाच लाखो रुपयांचा फटका बसला आहे. गेल्या महिन्यात या विभागाच्या खात्यामधून ६८ लाख रुपये काढण्यात आले होते. ही रक्कमही चार जणांच्या खात्यांवर वळती करण्यात आली. नंतर ती काढण्यात आली. या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास सुरू आहे.