• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महापालिकेने प्लास्टिक विरोधी कारवाईत १ हजार ६६ किलो प्लास्टिक केले जप्त; २० लाखांहून अधिक दंड वसूल

महापालिकेने १ जानेवारी ते जुलै २०२४ या कालावधीत प्लास्टिक विरोधी कारवाईत १ हजार ६६ किलो प्लास्टिक जप्त केले. ४०६ जणांविरोधात ही कारवाई करताना २० लाख ६० हजार रुपये दंड वसूल केला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 9, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते, नाल्यांमध्ये टाकले जाणारे प्लास्टिक हे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. पावसाळ्यामध्ये तुंबणाऱ्या पाण्याला कचऱ्यात टाकले जाणारे प्लास्टिक हेच कारणीभूत ठरते. यामुळेच पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबते. या घातक प्लास्टिक वापराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्लास्टिकबंदीची घोषणाही करण्यात आली. या बंदीची अंमलबजावणी करताना महापालिकेकडून कारवाईचा बडगाही उचलला जातो. जानेवारी पासून ते जुलै अखेरीपर्यंत केलेल्या कारवाईतून तब्बल एक हजार किलोंपेक्षा जास्त प्लास्टिक विविध ठिकाणांहून जप्त केले आहे. याशिवाय २० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम दंड स्वरूपात वसूल केली आहे. या कारवाईत सर्वाधिक प्लास्टिक मुलुंड, घाटकोपर, सँडहर्स्ट रोड, मशीद रोड, अंधेरी या भागांत आढळले आहे. मुंबईत २६ जुलै, २००५ रोजी आलेल्या महापुराला नाल्यात साठलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यानंतर ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. या बंदीनंतर ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री किंवा त्या बाळगणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाईला सुरूवात झाली. करोनाकाळात ही कारवाई थंडावली आणि त्यानंतर महापालिकेने १ जुलै, २०२२ पासून बंदी घातलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला पुनरुज्जीवित केले होते. त्यानुसार बाजार, दुकाने आणि आस्थापना, परवाना विभागाचे प्रभागनिहाय पथक दुकानांना भेट देतानाच बंदी असलेले प्लास्टिक जप्त करू लागले. दुकानदाराने बंदी असलेले प्लास्टिक वापरल्यास दंड वसूल करून त्यानंतर जप्त केलेले प्लास्टिक महापालिका प्रभागांतील गोदामात ठेवू लागले. ही कारवाई सातत्याने सुरू असली तरीही प्लास्टिक वापराला पूर्णपणे आळा बसलेला नाही.

महापालिकेने १ जानेवारी ते जुलै २०२४ या कालावधीत प्लास्टिक विरोधी कारवाईत १ हजार ६६ किलो प्लास्टिक जप्त केले. ४०६ जणांविरोधात ही कारवाई करताना २० लाख ६० हजार रुपये दंड वसूल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे १९ हजार ४१३ ठिकाणी भेटी दिल्यानंतर अवघ्या ४०६ केसेस दाखल झाल्याचे समोर आले आहे. एकट्या जुलै महिन्यात ६१२ किलोचे प्लास्टिक जप्त केले आहे. या महिन्यात १३ लाख ४५ हजार रुपये दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.  मुंबईत आढळणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण अधिकच असते. यामध्ये भाजी, फळांसाठी वापरण्यात येणाऱ्यांमध्ये सर्वाधिक पिशव्या, खाद्यपदार्थांच्या पाकिटांची आवरणे यांचा समावेश असतो. त्यापाठोपाठ कचऱ्यामध्ये सर्वाधिक प्लास्टिक बाटल्याही आढळतात. हॉटेल, खाद्यपदार्थ स्टॉल्ससह अन्य दुकानांतून प्लास्टिक बाटलीबंद पाणी विकत घेतले जाते आणि त्याचा वापर झाला की ते कचऱ्यात टाकण्यात येते. बाटल्या आणि थाळ्या, ग्लास, चमचे, पिशव्या, वाट्या, कंटेनर, स्ट्रॉ, कप या प्लास्टिकचाही वाढता वापर हा पर्यावरण आणि आरोग्यालाही घातकच आहे. त्यामुळे या प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून त्यापासून विविध वस्तू बनवण्याचा विचार महापालिका गेल्या काही वर्षांपासून करत आहे. प्लास्टिक कचरा हा मुंबईकरांकडून जमा करण्याचा निर्णय घेताना त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर २४ पैकी पाच प्रभागांमध्ये पाच केंद्रे स्थापन केले जाणार होती. ही केंद्रे स्थापन झाली की नाही, याबाबत महापालिकेनेही काहीही माहिती दिलेली नाही.

नेमका कसला कचरा?
मुंबईत सध्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी ४८ केंद्रे कार्यरत आहेत. कचऱ्यावर प्रक्रिया करून ते विलगीकरण करतात. मुंबईत दररोज सहा हजार ते सात हजार मेट्रीक टन कचरा आढळतो. ओला, सुका कचरा असे विलगीकरण करताना सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक बाटल्या, वर्तमानपत्र, मिक्स पेपर, बॉक्स, पुठ्ठा, कार्डबोर्ड, थर्माकोल, काचेच्या बाटल्या, कपडे, ई-कचरा इत्यादींचा समावेश असतो.

सर्वाधिक प्लास्टिक पुढील प्रभागांत…
मुलुंड टी प्रभाग- १०६ किलो
घाटकोपर एन प्रभाग- ७६.४५ किलो
अंधेरी पश्चिम के पश्चिम प्रभाग- ४० किलो
सँडहर्स्ट रोड आणि मशीद रोड परिसर बी प्रभाग- ४४ किलो
एफ दक्षिण प्रभाग, परळ- २३ किलो

Previous Post

वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधवांच्या हिताचाच विचार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

पुण्याहून आणखी ६ स्पेशल ट्रेनचं नियोजन; गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुण्याहून आणखी ६ स्पेशल ट्रेनचं नियोजन; गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION