मुंबई : करोना काळातील खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर व सूरज चव्हाण यांना समन्स बजावले आहे. त्यांना २५ नोव्हेंबरला चौकशीला बोलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

अमोल कीर्तीकर व सूरज चव्हाण दोघेही ठाकरे गटात आहेत. याप्रकरणी १ सप्टेंबरला फसवणूक, फौजदारी विश्वासघात, कट रचणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंके, सुजीत पाटकर, फोर्सव मल्टी सर्विसेसचे भागिदार व कर्मचारी, स्नेहा केटरर्स, तत्कालीन सहाय्यक आयुक्त (नियोजन), इतर पालिका अधिकारी व संबंधीत खासगी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. याप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू असतानाही दोघांची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती.
This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)