नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भरभरुन कौतुक केलं. विशेष म्हणजे नाराजीनंतर पहिल्यादांच त्यांनी इतक्या शब्दांत फडणीसांचं कौतुक केलं आहे.
नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भरभरुन कौतुक करण्यात आलं आहे. “अमिताभला बिग बी म्हणतात तर देवेंद्रजी सभागृहातला बिग डी आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “अमिताभ बॉलिवूडमधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहेत. डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका. हा डी म्हणजे डिव्होशनचा आहे. डी म्हणजे डेडीकेशनचा आहे. हा डिटरमेशनचा डी आहे”, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. “हम वो नहीं जो दिल तोड देंगे, थामकर हाथ, फिर साथ छोड देंगे, पाणी के तरह हैं दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहें हम जुदा नहीं होंगे”, अशी शेरोशायरी एकनाथ शिंदे यांनी भाषणात केली. “देवेंद्रजी आपका दिल भी जगह पर, दिमाग भी ठिकाणे पर, दोस्त भी अपनी जगह, और दुश्मन भी निशाणे पर अशा प्रकारचं काम तुम्ही करतात”, अशा शब्दांत शिंदेंनी फडणवीसांचं कौतुक केलं.







