• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

‘चरणसेवा’ उपक्रमातून ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्यसेवेचा लाभ

admin by admin
July 24, 2026
in पुणे, महाराष्ट्र, मुंबई
0
‘चरणसेवा’ उपक्रमातून ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्यसेवेचा लाभ
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : यंदाच्या आषाढी वारीत राज्य शासनाच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाने लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची प्रभावी काळजी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा समारोप शुक्रवार, २४ जुलै रोजी होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा लाभ राज्यातील १४ जिल्ह्यांतील तब्बल ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला. आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पायी प्रवास करावा लागत असल्याने स्नायूदुखी, पायांना फोड येणे, शारीरिक थकवा तसेच पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना तातडीची व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मागील वर्षी सात जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा यंदा विस्तार करून सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, सांगली, अमरावती आणि अहिल्यानगर या १४ जिल्ह्यांतील दिंडी मार्गावरील १४० मुक्कामस्थळांवर सेवा केंद्रे उभारण्यात आली. या केंद्रांमधून वारकऱ्यांना चरणसेवा, मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, प्रथमोपचार, आवश्यक औषधांचे वितरण, रुग्णवाहिका सुविधा तसेच गरजेनुसार पुढील उपचारांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे वारीदरम्यान उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक अडचणींवर त्वरित उपचार मिळाल्याने वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

या उपक्रमाच्या यशामध्ये विविध आरोग्य संस्था, डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांचा मोठा वाटा राहिला. एकूण १६४ आरोग्य संस्थांनी या सेवाकार्यात सहभाग नोंदविला. त्याचबरोबर ७ हजार ५३८ स्वयंसेवक तसेच ११ हजार ३३१ डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी योगदान दिले. चरणसेवेसाठी ३ हजार लिटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा वापर करण्यात आला, तर सेवाकार्यात सहभागी स्वयंसेवकांसाठी १० हजार टी-शर्ट उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, संसर्गजन्य आजारांपासून बचाव, रक्तदान, अवयवदान, निरोगी जीवनशैली तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. उपचारांबरोबरच आरोग्यविषयक जनजागृतीलाही या उपक्रमात तितकेच महत्त्व देण्यात आले. लोकसहभागातून साकारलेल्या या उपक्रमामुळे तब्बल ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांना प्रत्यक्ष चरणसेवा आणि आरोग्यसेवा उपलब्ध झाली. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ‘चरणसेवा’ पोहोचविण्यात यश आल्याचा आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला विविध आरोग्य संस्था, दानशूर व्यक्ती, डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि हजारो स्वयंसेवकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून लोकसहभाग हीच या सेवाकार्याची सर्वात मोठी ताकद ठरली.

Previous Post

‘दादा’ पुन्हा बारामतीच्या चौकात! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवारांच्या पहिल्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

Next Post

अखेर २६ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; सरकारच्या लेखी आश्वासनानंतर निर्णय!

admin

admin

Next Post
अखेर २६ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; सरकारच्या लेखी आश्वासनानंतर निर्णय!

अखेर २६ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; सरकारच्या लेखी आश्वासनानंतर निर्णय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

July 24, 2026
काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

July 24, 2026
वसईत एकाच छताखाली येणार सर्व शासकीय कार्यालये

वसईत एकाच छताखाली येणार सर्व शासकीय कार्यालये

July 24, 2026
पवार कुटुंबात वाजणार सनई-चौघडे! पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख ठरली

पवार कुटुंबात वाजणार सनई-चौघडे! पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख ठरली

July 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (45)
  • पालघर (66)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,720)
  • मुंबई (3,296)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (480)
  • वसई-विरार (43)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (204)

Follow Us

Recent News

नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

July 24, 2026
काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

July 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

नागालँडच्या तरुणाची अनोखी मदत! जंतरमंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी दिली १५० पिझ्झांची ऑर्डर

July 24, 2026
काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

काँगोमध्ये इबोलाचा भीषण उद्रेक; दोन महिन्यांत १,००० हून अधिक मृत्यू!

July 24, 2026
वसईत एकाच छताखाली येणार सर्व शासकीय कार्यालये

वसईत एकाच छताखाली येणार सर्व शासकीय कार्यालये

July 24, 2026
पवार कुटुंबात वाजणार सनई-चौघडे! पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख ठरली

पवार कुटुंबात वाजणार सनई-चौघडे! पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख ठरली

July 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION