पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच होणाऱ्या या निवडणुकीवर दुःखाचे सावट आहे. उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांनी बारामतीतील काटेवाडी येथे सकाळी मतदान केले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ही निवडणूक प्रक्रिया सुरू असून बारामतीत या मतदानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत होत असलेली ही पहिलीच निवडणूक असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. काटेवाडी आणि परिसरात सकाळपासून मतदारांची चांगली उपस्थिती दिसून आली. निवडणूक यंत्रणेकडून सुरळीत आणि शांततेत मतदान पार पडत असल्याची माहिती देण्यात आली. बारामतीतील ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यातील सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत मतदान करण्याचे आवाहन केले.







