पुणे : दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा निकाल कधी लागणार याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १० वी- १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ११ मार्च रोजी संपली आहे. त्यानंतर आता महिना होऊन गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सीबीएसई बोर्डाचा निकाल लवकरच लागणार आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच महिन्यात कधीही निकाल लागू शकतो. मागील अनेक वर्षांच्या ट्रेंडनुसार १०वीचा निकाल एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. दरम्यान, सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. या वर्षी दोन टर्ममध्ये परीक्षा झाल्याने निकाल वेगवेगळ्या तारखेला लागण्याची शक्यता आहे. खरंतर बोर्ड लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल घोषित करण्याच्या तयारीत आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात जाहीर केला होता. यंदा बारावीचा निकाल आधी लागेल. त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफेकेट एकाच वेळी मिळणार आहे. दोन्ही मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर विद्यार्थ्याचा फोटो आणि एक क्युआर कोड देखील असणार आहे. या क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्याची माहिती सहज मिळणार आहे. यामुळे बोगस मार्कशीट आणि सर्टिफिकेट त्वरित ओळखता येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना निकालाची प्रत दिली जायची. त्यानंतर सुमारने सहा महिन्यानंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिले जायचे. मार्कशीट आणि सर्टिफिकेटमध्ये फोटो आणि क्युआर कोड स्कॅन करण्याची सुविधा नव्हती.






