वृत्तसंस्था : वन प्लस ही प्रीमियम स्मार्टफोन कंपनी भारतातील आपले ऑपरेशन बंद करणार असल्याची अफवा पसरली होती. वन प्लस ही कंपनी त्यांची पेरेंट कंपनी ओपोमध्ये मर्ज होणार असे वृत्त अनेक संस्थांनी दिले होते. मात्र यावर आता वन प्लसचे इंडिया CEO रोबिन ल्यू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यावर खुलासा केला आहे.
एक्स प्लॅटफॉर्मवर रोबिन ल्यू यांनी पोस्ट करून भारतातील वन प्लसचे ऑपरेशन बंद होणार ही माहिती चुकीची आहे. असा दावा हा पूर्णपणे खोटा आहे. वन प्लस भारतात आपली सेवा देत राहणार आहे. प्लसने सांगितले की, ‘नुकतेच एक तथ्यहीन बातमी समोर आली होती. त्यात दावा करण्यात आला होता की वन प्लस बंद होणार आहे. ही खूप चुकीची माहिती आहे. OnePlus India चे बिजनेस ऑपरेशन सामान्य स्वरूपात सुरू राहणार आहेत.







