नवी मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक अशा तब्बल ५७ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात काही अधिकारी असेही आहेत की ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. हे वर्ष निवडणुकांचे वर्ष असणार आहे. लोकसभा, विधानसभा आणि पाठोपाठ महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. त्या अनुषंगाने पोलीसही तयारी करीत असून पूर्ण वर्ष निवडणूक धामधुमीत जाणार आहे. हे पाहता संवेदनशील ठिकाणी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याकडे कल दिसून येत आहे.