मुंबई : बदलापूर येथे शाळेत झालेल्या दोन लहान मुलींवर झालल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला मोठा दणका दिला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही असे कोर्टाने म्हटले आहे.
अशा प्रकारचा बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या या बंदच्या विरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी दरम्याान कोर्टाने सरकारला हे आदेश दिले आहेत.