पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात मोबाइल चोरट्याला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने पकडले. चोरट्याकडून २० मोबाइल संच जप्त करण्यात आले. धमेंद्र लालबिहारी साह (वय २४, सध्या रा. दांडेकर पूल, मूळ रा. मुझफ्फरपूर, बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. साह याने मोबाइल चोरले. पुणे रेल्वे स्थानक परिसरात तो मोबाइल विक्री करुन मूळगावी जाणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून २० मोबाइल संच जप्त करण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त अधीक्षक गणेश शिंदे, उपविभागीय अधिकारी देवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक वासनिक, सहायक निरीक्षक झोडगे, हवालदार कदम, दांगट, टेके, कांबळे, बोरनारे, बिडकर, मधे, केंद्रे आदींनी ही कारवाई केली.