• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण पोषक आहार देणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 13, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषक आहार दिला जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. आठवड्यातून एकदा अंड्यासह पोषक तत्व आणि विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन हा आहार तयार केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत (पूर्वीचे नाव शालेय पोषण आहार योजना) सद्य:स्थितीतील पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक मंत्री श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्य तथा प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी, व्यापारी महासंघ सिंधुदुर्गचे कार्यवाह नितीन वाळके, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना गडचिरोलीचे अधीक्षक वैभव बारेकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे, तर योजनेचे राज्य समन्वय अधिकारी देवीदास कुलाळ, सहसचिव इम्तियाज काझी, अवर सचिव प्रमोद पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, विद्यार्थ्यांना आहारातून पोषक तत्त्वे मिळावीत. त्याचबरोबर त्यांनी ते पदार्थ आवडीने खावीत हा विचार करून पाककृती निश्चित कराव्यात. यासाठी दररोज वैविध्यपूर्ण आहार निश्चित करून त्यात दाळ-भात आणि खिचडी बरोबरच हिरवा वाटाणा, व्हेज पुलाव, सोया चंक्स, मसाले भात, वांगी भात, नाचणी सत्व, भगर, शेवगा आदींचा समावेश करावा. जे विद्यार्थी अंडे खातात त्यांना आठवड्यातून एकदा अंडे द्यावे. तसेच अन्य विद्यार्थ्यांना केळीचा पर्याय ठेवावा. आहारात या पदार्थांबरोबर एका गोड पदार्थाचा देखील समावेश करावा. शाळांमध्ये परसबाग आवश्यक करण्यात आली आहे. यातील भाज्या आणि सलादचा देखील आहारात समावेश करावा, असे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी दिले. यापूर्वीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेफ विष्णू मनोहर यांनी काही पाककृती तयार केल्या आहेत. त्यापैकी केंद्र शासनाच्या निकषात बसणाऱ्या पदार्थांचा देखील आहारात समावेश करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

सध्या जेथे केंद्रीय स्वयंपाकगृह आणि बचत गटांमार्फत आहाराचा पुरवठा करण्यात येतो त्यातील पोषण तत्व आणि दर्जाची तपासणी करण्यासाठी समिती सदस्यांना प्राधिकृत करण्याचे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर सदस्यांनी आहार तयार करणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षण द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांची पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविणे, गळती थांबविणे, पोषणयुक्त आहार पुरविणे, आरोग्याच्या चांगल्या सवयी लावणे आणि सामाजिक समानता विकसित करण्यासाठी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळा, वस्ती शाळा, अनुदानित अपंग शाळा, महात्मा फुले शिक्षण हमी योजनेअंतर्गत शैक्षणिक केंद्र या ठिकाणी पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत. राज्यातील ८५,६४८ शाळांमधील एक लाख ६५ हजार १०३ विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत या योजनेचा लाभ देण्यात येत असल्याची माहिती अवर सचिव श्री. पाटील यांनी यावेळी दिली.

Previous Post

पोलिसांनी सापळा रचून मोबाइल चोरट्याला पुणे रेल्वे स्थानकात पकडले

Next Post

६६ लाखांची बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी बिहारमधील दोघांना सायबर पोलिसांकडून अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

६६ लाखांची बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी बिहारमधील दोघांना सायबर पोलिसांकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION