मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकल सेवा सीएसएमटी ते कल्याण, पनवेल मार्गावर धावतील.
मुख्य मार्गावरील विशेष गाड्यांचे वेळापत्रकः
१. १९ ते २० नोव्हेंबर (मंगळवार-बुधवार रात्री)
डाऊन मार्ग : सीएसएमटी विशेष लोकल पहाटे तीन वाजता सुटेल, कल्याणला सकाळी ४:३० वाजता पोहोचेल.
अप मार्ग : कल्याणहून पहिली लोकल पहाटे तीन वाजता सुटेल, सीएसएमटीला सकाळी ४:३० वाजता पोहोचेल.
२. २० ते २१ नोव्हेंबर (बुधवार-गुरुवार रात्री)
डाऊन मार्ग : सीएसएमटीहून एक वाजून दहा मिनिटांनी सुटेल, कल्याणला २:४० वाजता पोहोचेल. दुसरी गाडी सीएसएमटीहून अडीच वाजता सुटेल, कल्याणला चार वाजता पोहोचेल. अप मार्ग : कल्याणहून एक वाजता सुटेल, सीएसएमटीला अडीच वाजता पोहोचेल. दुसरी गाडी कल्याणहून दोन वाजता सुटेल, सीएसएमटीला साडेतीन वाजता पोहोचेल.
हार्बर मार्गावरच्या गाड्यांचे वेळापत्रक
१. १९ ते २० नोव्हेंबर (मंगळवार-बुधवार रात्री)
डाऊन मार्ग : सीएसएमटीहून पहिली लोकल पहाटे तीन वाजता सुटेल, पनवेलला चार वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.
अप मार्ग : पनवेलहून पहिली लोकल पहाटे तीन वाजता सुटेल, सीएसएमटीला चार वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.
२. २० ते २१ नोव्हेंबर (बुधवार-गुरुवार रात्री)
डाऊन मार्ग : सीएसएमटीहून रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी विशेष लोकल सुटेल, ती पनवेलला तीन वाजता पोहोचेल.
दुसरी गाडी सीएसएमटीहून अडीच वाजता सुटेल, पनवेलला चार वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल.
अप मार्ग : पनवेलहून रात्री एक वाजता विशेष लोकल सुटेल, सीएसएमटीला दोन वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल.
दुसरी गाडी पनवेलहून अडीच वाजता सुटेल, सीएसएमटीला तीन वाजून पन्नास मिनिटांनौ पोहोचेल.