• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे

कर्करोग तपासणी, रक्तदान आणि जनजागृतीवर भर

admin by admin
June 25, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ जुलै दरम्यान राज्यात विशेष आरोग्य शिबिरे
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील नागरिकांमध्ये कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्ताची कमतरता तसेच हाडांच्या झिजेसारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विशेष आरोग्य मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त १५ जुलै ते २२ जुलै या कालावधीत राज्यभर आरोग्य तपासणी आणि विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या मोहिमेत रक्तदान शिबिरांवर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित बैठकीत या उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेले तज्ज्ञ डॉक्टर, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि उपचार क्षमता ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, हाडांची घनता तपासणी तसेच विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शिबिरांमध्ये नागरिकांची तपासणी करून आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. गरजेनुसार पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अवयव प्रत्यारोपण आणि महत्त्वाच्या शस्त्रक्रियांसाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून मदत मिळवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत प्राध्यापक, निवासी डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रशासकीय कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा समावेश असेल. आरोग्य शिबिरांचे नियोजन, समन्वय, अंमलबजावणी आणि अहवाल तयार करण्याची जबाबदारी या समितीकडे सोपवण्यात येणार आहे. राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देशही मंत्री मुश्रीफ यांनी दिले आहेत. स्थूलता, हर्निया, व्हेरिकोज शिरा, थॅलेसेमिया, मधुमेह, हृदयविकार, वेदना व्यवस्थापन, मानव दूध बँक, स्तनपान, कृत्रिम अवयव आणि इतर असंसर्गजन्य आजारांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच शिबिरस्थळी स्वच्छता राखणे, वृक्षारोपण उपक्रम राबवणे आणि स्थानिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने अधिकाधिक नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेमुळे ग्रामीण व दुर्बल घटकांतील नागरिकांना वेळेत आरोग्य तपासणी आणि उपचार मिळण्यास मदत होणार असून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जनजागृती वाढण्यासही हातभार लागणार आहे.

शिबिरात काय असणार :

  • रक्तदान शिबिरात स्वेच्छा रक्तदानास प्रोत्साहन देणे, राज्यातील रक्तसाठा वाढविणे हे उद्दिष्ट
  • स्तन कर्करोग तपासणी शिबिर- स्तन कर्करोगाबाबत क्लिनिकल तपासणी आणि आवश्यकतेनुसार उपचार.
  • गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करून जनजागृती व समुपदेशन करण्यात येणार.
  • हाडांची घनता तपासणी (बोन मिनरल डेन्सिटी) शिबिरात गुडघा व खुब्याचा सांधा तपासणी होणार. अस्थिरोग तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येणार.
  • मुख कर्करोग- तंबाखूमुक्ती जनजागृती, मुख तपासणी व पूर्वकर्करोग अवस्थांचे लवकर निदान यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात येणार.
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर आणि बारामती येथे डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपिक) हर्निया शस्त्रक्रिया व स्थूलता (ओबेसिटी) तपासणी शिबिर होणार.
  • अशुद्ध रक्तवाहिन्यांची सूज (व्हेरिकोज व्हेन्स) डॉप्लर तपासणी व उपचार शिबिर कोल्हापूर आणि बारामतीमध्ये होणार.
Previous Post

शिवभक्तांना मोठा दिलासा! रायगडावरील पायरी मार्गावरील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर

Next Post

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

admin

admin

Next Post
सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

सावधान! हेल्मेट असूनही दंड होऊ शकतो; जाणून घ्या वाहतूक विभागाचे ६ महत्त्वाचे नियम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,025)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,807)
  • मुंबई (3,356)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION