नाशिक : राज्यामध्ये भूमाफिया सर्वसामान्यांच्या जमिनी बळकवण्याचे प्रकार आता कॉमन झाले आहेत. नाशिक मध्ये मात्र यापेक्षा धक्कादायक आणि वेगळी घटना घडली आहे. नाशिक पोलीस आयुक्तालय थेट बळकावण्याचा प्रयत्न समोर आल्याने खुद्द नाशिक पोलिसांनी आता २१ भूमाफीया विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाशिक मध्ये यापूर्वी भूमाफियांकडून सिने कलाकार आणि अभिनेत्यांचीही फसवणूक झाली होती. आता मात्र भूमाफियांनी थेट पोलीस आयुक्तालयच बनावट दस्तऐवज बनवत तयार करून हडप करण्याचा डाव आखला आहे. भूमाफियांच्या टोळीत नाशिकमधील नामांकित बांधकाम व्यवसायिकांचाही सहभाग आहे. भूमाफियांच्या टोळीसह नाशिक मधील काही बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक मध्ये भूमाफीयांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरातील शरणपूर गावठाण परिसरात असलेल जुने नाशिक पोलिस आयुक्त कार्यालय आहे.
नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन च्या मालकीची असलेली शरणपूर गावठाणातली शहरातील मध्यवर्ती भागातील जागा आहे. सध्याचे उपायुक्त कार्यालय असलेल्या या जागेमध्ये नुकतेच मुख्यमंत्र्यांनी यावर कॉमन मॅन च्या पुतळ्याच उद्घाटन केले होते. या जागेची किंमत जवळपास तीनशे कोटी रुपये आहे. मात्र ही जागा अवघ्या काही कोटींमध्ये आपल्या मालकीच्या नावे करण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यवसायिकांनी केल्याचं उघड झालये. याबाबतचा अहवाल भूमी अभिलेख विभागांना दिल्यामुळे आता नाशिक पोलिसांनीच शहरातील २१ नामवंत बांधकाम व्यवसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ख्रिश्चन समुदायाच्या या ट्रस्ट कडून पोलिसांनी ही जागा गेल्या वीस वर्षापासून भाड्याने घेतली आहे. जवळपास तीन हजार एकर असलेल्या विविध मालमत्ता एन डी टी ए नावाने असल्याने वादग्रस्त म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी महेश झगडे यांनी या मालमत्तांच्या व्यवहारांवर बंदी आणली होती. सातबारावर तसे शिक्केही मारण्यात आले होते. मात्र नवीन एन डी सी कंपनी स्थापन करून धर्मदाय आयुक्त च्या संगणमताने काही जमिनींचे व्यवहार करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता बांधकाम व्यावसायिकांचे उद्योग समोर आणण्यासाठी महसूल प्रशासनातून अहवाल मागवले. या अहवालानुसार ही संपत्ती बळकवण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झालं. मात्र १९४५ आणि ५४ च्या खरेदी विक्री रेकॉर्डनुसार ही जागा केवळ एनडीटीएची असल्याच समोर आले आहे. राज्यातील महसूल यंत्रणेचे कायदे इतके कमकुवत आहे की त्याचा फायदा घेत अधिकाऱ्यांशी संगणमत करत बांधकाम व्यावसायिक आता भूमाफिया बनले आहेत. आता पोलिसांवरच संक्रांत आल्याने पोलिसांनी मोका नुसार कारवाई करण्याची गरज आहे.







