• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

admin by admin
July 27, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : खासगी ॲप-आधारित टॅक्सी सेवांमधील मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी राज्य परिवहन विभागाने ‘महाराष्ट्र मोटार वाहन ॲग्रिगेटर नियम, २०२६’ अंतर्गत महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. विशेषतः विमानतळ, रेल्वे स्थानके आणि रुग्णालयांसारख्या अत्यावश्यक ठिकाणांसाठी स्वीकारलेली राईड चालकाने रद्द केल्यास त्याच्यावर सामान्य दंडाच्या तुलनेत पाचपट दंड आकारला जाणार आहे. या निर्णयामुळे आपत्कालीन किंवा वेळेच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रवासासाठी शेवटच्या क्षणी राईड रद्द होण्याच्या प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ओला, उबर आणि इतर ॲप-आधारित टॅक्सी सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांकडून चालकांकडून वारंवार राईड रद्द केल्या जात असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे सातत्याने प्राप्त होत होत्या. अनेकदा चालकांनी राईड स्वीकारल्यानंतर ती अचानक रद्द केल्याने प्रवाशांना पुन्हा वाहन बुक करण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने नवीन नियम लागू करत प्रवाशांच्या हिताचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. नियमानुसार, चालकाने स्वीकारलेली राईड रद्द केल्यास एकूण भाड्याच्या १० टक्के किंवा कमाल १०० रुपये दंड आकारला जाईल. विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयासाठीची राईड रद्द झाल्यास हा दंड पाचपट असेल. दंडाची रक्कम थेट संबंधित प्रवाशाच्या ॲप खात्यात जमा केली जाणार आहे. तसेच अशा महत्त्वाच्या प्रवासासाठी राईड रद्द होऊ नयेत, यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा विकसित करण्याचे निर्देशही ॲग्रिगेटर कंपन्यांना देण्यात आले आहेत. अपेक्षित वेळेनंतर १० मिनिटांपेक्षा जास्त विलंब होऊनही चालक पिकअप पॉइंटवर पोहोचला नाही, तर ती राईड रद्द झाल्याचे मानले जाणार आहे.

नवीन नियमांनुसार ॲग्रिगेटर कंपन्यांना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सेवा गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक ॲपमध्ये २४x७ कॉल सेंटर, तक्रार निवारण यंत्रणा, लाईव्ह लोकेशन शेअरिंग, चालकाचे छायाचित्र, तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये सेवा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. चालकांना एकाच वेळी एकापेक्षा अधिक ॲग्रिगेटर कंपन्यांसोबत काम करण्याची मुभा देण्यात आली असली, तरी त्यांच्या पोलीस पडताळणी, वैद्यकीय तपासणी आणि मानसशास्त्रीय चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे. याशिवाय, प्रवासादरम्यान वाहनात यांत्रिक बिघाड झाल्यास संबंधित ॲग्रिगेटर कंपनीने महापालिका किंवा नगर परिषद हद्दीतील प्रवासासाठी ३० मिनिटांच्या आत, तर १०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या आंतरशहरी प्रवासासाठी ६० मिनिटांच्या आत पर्यायी वाहन उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे. या नव्या नियमांमुळे ॲप-आधारित टॅक्सी सेवांमध्ये अधिक उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि प्रवाशाकेंद्रित सेवा निर्माण होण्याची अपेक्षा असून, वारंवार होणाऱ्या राईड रद्दीकरणाच्या प्रकारांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,729)
  • मुंबई (3,302)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION