नवी दिल्ली : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा यंदा १ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. २३ सप्टेंबर या सर्व विजेत्यांचा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं
कलाकार व तंत्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. भारतात १९५४ पासून राष्ट्रीय पुरस्कारांची सुरुवात झाली होती. यंदा शाहरुख खानला तब्बल ३३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रांत मॅसी आणि शाहरुख खान यांना विभागून देण्यात आला आहे. तर, राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. यासह यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल यांना प्रदान करण्यात आला आहे.







