नवी दिल्ली : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी संजय रॉय याला आज सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याला शनिवारी दोषी ठरवले होते. त्याला आज सियालदह न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बान दास यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. डॉक्टरच्या पालकांनी न्यायालयाला सांगितले की त्यांना कोणतीही भरपाई नको आहे. “मला फक्त आमच्या मुलीसाठी न्याय हवा आहे. दुसरे काहीही नाही,” पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे. “मला माहित आहे की या मृत्यूची भरपाई होऊ शकत नाही. ती राज्याची जबाबदारी आहे कारण ती एक ऑन ड्युटी डॉक्टर होती आणि आम्हाला ही भरपाई द्यावी लागेल कारण आम्ही कायद्याने बांधील आहोत,” न्यायाधीश म्हणतात. सियालदह दिवाणी आणि फौजदारी न्यायालय आरजी कर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला सोमवारी दुपारी २:४५ वाजता शिक्षा सुनावणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपी संजय रॉयला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. ५७ दिवसांनंतर सियालदह जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बन दास यांनी, त्याला दोषी घोषित केले. तसे, सियालदह न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आपल्या निकालात म्हटले आहे. कोर्टाने फॉरेन्सिक रिपोर्टवर विश्वास ठेवला. या अंतर्गत न्यायालयाने या प्रकरणात संजय रॉय याला दोषी ठरवले. या प्रकरणी आज न्यायालय संजय रॉय याला शिक्षा सुनावणार आहे.
प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या पालकांनी सीबीआय तपासावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणाची देखरेख करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात आणि कलकत्ता उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात सियालदाह विशेष न्यायालयाला शिक्षा सुनावण्यापासून रोखण्यात यावे आणि संपूर्ण प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. यानंतर शनिवारी १८ जानेवारी निकालापूर्वी, पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, आरोपींना शिक्षा न्यायालय ठरवेल, परंतु आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावत राहू. ८ ऑगस्ट २०२४ च्या रात्री आरजी कार रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या करण्यात आली. ९ ऑगस्ट रोजी सकाळी डॉक्टरचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये आढळला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, पोलिसांनी १० ऑगस्ट रोजी संजय रॉय नावाच्या एका नागरी स्वयंसेवकाला अटक केली. या घटनेनंतर कोलकातासह देशभरात निदर्शने झाली. बंगालमध्ये, आरोग्य सेवा दोन महिन्यांहून अधिक काळ ठप्प होत्या. कोलकाता आरजी कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात आज २० जानेवारी सियालदाह न्यायालय दोषी संजय रॉयला शिक्षा सुनावणार आहे. संजयला कमीत कमी जन्मठेपेची शिक्षा होईल किंवा त्याला मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते. न्यायालयाने १६२ दिवसांनंतर १८ जानेवारी रोजी मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरवले होते. याचपार्श्वभुमीवरन न्यायालय आणि आजूबाजूच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था आहे. कोलकाता पोलिसांचे २ उपायुक्त, ५ सहाय्यक आयुक्त, १४ निरीक्षक, ३१ उपनिरीक्षक, ३९ सहाय्यक उपनिरीक्षक, २९९ कॉन्स्टेबल आणि ८० महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.