• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

admin by admin
July 24, 2026
in पालघर
0
पावसाचा तांडव, मुंबई-गुजरात रेल्वे ठप्प! पालघरमध्ये २५ जणांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचा मोठा फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीलाही बसला आहे. मुंबई-गुजरात मार्गावरील अनेक मेल, एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्या सुरक्षिततेच्या कारणास्तव रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने आणि काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून सूर्या नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कुर्झे आणि धामणी धरणांतील पाणीसाठा झपाट्याने वाढल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणांचे दरवाजे उघडले. त्यामुळे सूर्या नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. किराट गावात पुराचे पाणी शिरल्याने २५ नागरिक अडकून पडले होते. अनेकांनी घरांच्या छतांवर आश्रय घेत मदतीची प्रतीक्षा केली. पालघरचे तहसीलदार रमेश शेडगे यांच्या आदेशानंतर एनडीआरएफ, मनोर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी स्पीडबोटच्या साहाय्याने रात्री उशिरापर्यंत बचावकार्य राबवत सर्व २५ नागरिकांची सुखरूप सुटका केली. मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांनीही या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई-गुजरात मार्गावरील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. दादर–हनुमानगढ एक्स्प्रेस, बांद्रा टर्मिनस–अहमदाबाद कर्णावती एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल–अहमदाबाद एसी डबल डेकर, बांद्रा टर्मिनस–महुवा सुपरफास्ट, बोरिवली–अहमदाबाद एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल–गांधीनगर कॅपिटल, मुंबई सेंट्रल–अहमदाबाद शताब्दी, मुंबई सेंट्रल–वापी, मुंबई सेंट्रल–अहमदाबाद तसेच बांद्रा टर्मिनस–सुरत या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत NTES प्रणाली किंवा पश्चिम रेल्वेच्या अधिकृत X हँडलवर गाड्यांची अद्ययावत माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, नवसारी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना पश्चिम रेल्वे आणि नवसारी चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सहकार्याने पिण्याचे पाणी, चहा आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांत पालघर, ठाणे आणि उत्तर कोकणातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा ७ विकेट्सने धुव्वा!

Next Post

पंढरपूर कॉरिडॉरमुळे भाविकांना आधुनिक सुविधा; अडीच वर्षांत विकासकाम पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,115)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,042)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,966)
  • मुंबई (3,447)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

प्रारूप मतदार यादीत १ कोटी २२ लाख मतदारांच्या माहितीतील त्रुटी; अतिरिक्त पुरावे सादर करणे बंधनकारक

September 10, 2026
‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

‘भाऊबीज नंतर, आधी संघर्ष!’ १३ व्या दिवशीही मनोज जरांगे ठाम; मुंबईत धडक देण्याचा इशारा कायम

September 10, 2026
चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

चेंबूरमध्ये ‘सिरियल कॅट किलर’ची दहशत! २० मांजरांची क्रूर हत्या; माहिती देणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION